आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिंगायत धर्म मान्यतेच्या प्रस्तावाचा महाराष्ट्रात परिणाम नाहीच, कर्नाटकचा निर्णय राजकीय हेतूने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- मुळातच लिंगायत अाणि वीरशैव यात एकमत होत नसताना कर्नाटक सरकारने लिंगायत धर्माला मान्यता देण्याबाबत केंद्र सरकारकडे शिफारस केली. त्यांचा हा निर्णय केवळ राजकीय अाहे, त्याचा परिणाम महाराष्ट्रात तर होणार नाहीच. तसेच केंद्र सरकारही त्याला मान्यता देईल का? हा प्रश्न अाहे. मुळातच महाराष्ट्रात अाज लिंगायत समाजातील शिलवंत, पंचम आणि दीक्षावंत या घटकांचेच आरक्षण बाकी आहे. त्यामुळे सामाजिक पातळीवरही या निर्णयाचा अाज तरी फारसा काही परिणाम जाणवणार नाही. कर्नाटक न्यायालयाने व उच्च न्यायालयाने वीरशैव लिंगायत हा स्वतंत्र धर्म होऊ शकत नाही, असे सांगितलेले असताना निवडणुकांच्या ताेंडावर घेण्यात आलेला हा निर्णय आहे, अशा प्रतिक्रिया महाराष्ट्रातील लिंगायत समाजातून व्यक्त हाेत अाहेत. दरम्यान, िलंगायत समाजातील अभ्यासक व महाराष्ट्र वीरशैव सभेचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ सदस्य डॉ. शिवमूर्ती शाहीर व माजी कुलगुरू डाॅ. इरेश स्वामी अादींनी हा निर्णय राजकीय असल्याचेच म्हटले अाहे.    


डॉ. शाहीर म्हणाले की, ‘लिंगायत हा धर्म व्हावा अशी समाजबांधवांची इच्छा आहे. परंतु यासाठी राजकीय इच्छाशक्ती कमी पडते आहे. केंद्रानेही यास मान्यता देता येत नाही, असे सांगितले आहे. जैन समाजाने जसे एकसंध राहून व एकजुटीने स्वत:चे हित केले, तशी एकी लिंगायत समाजात दिसत नाही. जर वीरशैव हा धर्म म्हणून स्थापन झाला तर तो अल्पसंख्याक होईल. त्याचा फायदा लोकांना होण्यापेक्षा संस्थांनाच अधिक होईल. वीरशैव लिंगायत हा हिंदू धर्मातील एक पंथ आहे. अनादी कालापासून याचे अस्तित्व आहे. वीरशैव लिंगायत समाजातील गवळी, तेली यांना आरक्षण आहे, परंतु शिलवंत, पंचम आणि दीक्षावंत यांचेच आरक्षण बाकी आहे. वीरशैव लिंगायत हा हिंदू धर्मामधीलच एक पंथ आहे. शंकराला वीरशैव म्हणजे शंकराला मानणारे इतकाच अर्थ आहे, बाकी सध्या जे काही सुरू आहे, तो राजकीय विषयच अाहे.’

 

धर्म हा आचरणाचा विषय अाहे   

 

दोन दिवसांपूर्वी कर्नाटकात विरक्त मठाचे महास्वामीजी, श्री पंचाचार्य व श्री जगदगुरू यांनी एकत्र येऊन सांगितले की, ‘वीरशैव धर्माची स्थापना जी आहे ती महात्मा बसवेश्वरांच्या आधीपासून आहे. महात्मा बसवेश्वरांनी जर याची स्थापना केली असती तर ते १२ व्या शतकात आले. पण त्याआधी हा धर्म नव्हता का? स्वत: बसवेश्वरांनी जातवेद मुनींकडून दीक्षा घेतली, असा उल्लेख आहे.  बसवेश्वर हे धर्म सुधारक होते, धर्म संस्थापक नव्हे. धर्म हा केवळ ग्रंथात नाही, तर आचरणाचा विषय आहे.  राजकीय पातळीवर अल्पसंख्याक म्हणजे मधाचे बोट लावणे असे आहे. केवळ काही सवलती मिळतात म्हणून मी या धर्माचा आहे, हे चुकीचे आहे. हा राजनैतिक डावपेच आहे, एका विशिष्ट समाजातील माणसे निवडणुकीत पाठीशी राहावीत म्हणून अशी घोषणा केली असावी.    
- डॉ. इरेश स्वामी, माजी कुलगुरू सोलापूर विद्यापीठ, सोलापूर   

बातम्या आणखी आहेत...