आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर विमानतळाच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात, २ कोटींचा खर्च

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूरच्या विमान सेवेबाबत अद्याप प्रश्नचिन्ह कायम असले तरीही सोलापूर विमानतळ मात्र विमानसेवेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी सज्ज झाले. विमानतळाच्या मुख्य इमारतीचे विस्तारीकरण तर झालेच आहे शिवाय त्याला राष्ट्रीय विमानतळाचा लूक देखील आला आहे. इमारतीचे काम जवळपास पूर्ण झाले. उर्वरित काम अवघ्या १० दिवसांत पूर्ण होणार आहे. यासाठी सुमारे दोन कोटींचा खर्च आला आहे. 


भारतीय विमानतळ प्राधिकरणाने विमानतळाच्या मुख्य इमारतीच्या विस्तारीकरणाबरोबरच धावपट्टीचे विस्तारीकरण केले आहे. तसेच राष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना जी सुविधा मिळते ती सर्व सुविधा सोलापूर विमानतळावर मिळार आहे.


सोलापूरहून विमानसेवा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय विमानतळ प्राधिकरणाने हा निर्णय घेतला होता. त्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. लवकरच इमारत अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असेल. 
- रणजित कुमार चंडा, विमानतळ व्यवस्थापक, सोलापूर विमानतळ 

बातम्या आणखी आहेत...