आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​सोड्डी हल्ल्यातील दुसऱ्या जखमीचा मृत्यू, दरोडेखोरांच्या मारहाणीत झाले होते जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवेढा- सोड्डी येथे दरोडेखोरांच्या मारहाणीत जखमी झालेल्या मलकाप्पा रेवगोंडा बिराजदार (वय ६२) यांचा बुधवारी (दि. २१) सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. या दरोड्यातील मृत्यूची संख्या दोन झाली. सायंकाळी साडेसात वाजता पोलिस बंदोबस्तात बिराजदार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. १० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री सोड्डी येथे दरोडेखोरांनी पाच घरे फोडली होती. मलकप्पा बिराजदार यांना दरोडेखोरांनी दगडाने मारहाण केली होती. जत, सांगलीत उपचारानंतर गावी आलेले बिराजदार पुन्हा बेशुध्द पडले. सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. 
बातम्या आणखी आहेत...