आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर- स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत १२० घंटागाड्या घेण्याची तयारी महापालिकेने केली असून, त्यानुसार आॅर्डर दिली आहे. या घंटागाड्या आल्यावर स्मार्ट सिटी एरियासह शहरात रोज डोअर टू डोअर घंटागाड्या जातील आणि कांेडाळे मुक्त शहर ही संकल्पना सुरू होईल. महापालिकेने २५ कोटी रुपयांचा विशेष निधी, एलईडी दिवे, बागेची टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. या योजना सुरू झाल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडेल. शहरासाठी दुहेरी जलवाहिनी योजना झाल्यास विकासाला वाव मिळेल, असा विश्वास महापालिका आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांनी व्यक्त केला.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत घंटागाड्या घेण्यात येणार आहे. त्यानुसार दोन कंपनीने टेंडर भरले आहे. टप्याटप्याने गाड्या येतील आणि ओला व सुका कचरा वेगवेगळ्या पध्दतीने संकलित करण्यात येणार आहे. अमृत योजनेअंतर्गत बागेचे टेंडर काढण्यात येणार आहे. याशिवाय शहरात एलईडी दिवे बसवण्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू आहे. मुख्यमंत्री विशेष निधीतून २५ कोटी शहर विकासासाठी उपलब्ध असून, त्याची टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त डाॅ. ढाकणे यांनी दिली. दुहेरी जलवाहिनीवरून श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचे दिसून आले.
पाण्यामुळे विकास होईल
उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनी काम करण्याची इच्छा असून, त्यानुसार वस्तुस्थिती नुसार आराखडा तयार करण्यात आला आहे. शहरात ११० एमएलडी पाणी आल्यास शहरात तीन ऐवजी एक दिवसाआड पाणी पुरवठा होईल. पाणी पुरवठ्यात सुधारणा झाल्यास नागरिक पाणीपट्टी वाढवून देतील. पाण्याची उपलब्धी असल्यास शहरात उद्योग येतील, असे मत महापालिका आयुक्त डाॅ. ढाकणे यांनी व्यक्त केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.