आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरचे तेलेजु राज्य बालनाट्य स्पर्धेत प्रथम; पहिल्यांदाच राज्य बालनाट्य स्पर्धेत अमिट ठसा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिहिका शेंडगे - Divya Marathi
मिहिका शेंडगे

सोलापूर- महाराष्ट्र शासन सांस्कृतिक व कार्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पंधराव्या राज्य बालनाट्य स्पर्धेत सोलापूरच्या रंगसंवाद प्रतिष्ठान संस्थेने सादर केलेल्या तेलेजु या नाटकाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. संगीत, प्रकाशयोजना, अभिनय, वेशभूषा, नेपथ्य यासह दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक पटकावत या संघाने शासनाचे एक लाख रुपयांचे पारितोषिक जिंकले. सोलापूरला बालनाट्य स्पर्धेत पारितोषिक मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. 


मिहिका शेंडगे यांना दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक मिळाले. प्रकाशयोजनेचे प्रथम पारितोषिक प्रदीप सलगर याला तर नेपथ्याचे द्वितीय पारितोषिक प्रणव अलाटने पटकावले. 


प्रचंड आनंद झाला 
राज्यात प्रथम येण्याचा मान मिळाल्याचा प्रचंड आनंद झाला आहे. मात्र हे सगळे वेगळे कथा दिग्दर्शन आणि कलावंतांच्या कष्टामुळेच शक्य झाले. 
- मिहिका शेंडगे, दिग्दर्शिका 


दिग्दर्शक, कलावंतांचे यश 
लहान मुलांना घेऊन नाटक बसवणे प्रचंड अवघड असते. मात्र बालकलावंतांनी प्रचंड कष्ट केले. युवा दिग्दर्शिका मिहिका शेंडगे यांनी वेगळ्या संकल्पनेतून हे नाटक बसवल्यामुळे यश मिळाले अाहे. 
- डॉ. मीरा शेंडगे, लेखिका