आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरेश पाटील विषबाधा: सीआयडी तपासाची पालकमंत्री देशमुख करणार मुख्यमंत्र्यांकडे मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महापालिका सभागृह नेता सुरेश पाटील विषबाधा प्रकरणाची शासनाने चौकशी करावी, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. याप्रकरणी सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची माहिती, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली. दोन ते तीन दिवसांत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही मागणी करण्यात येणार आहे.

 
सभागृहनेते पाटील यांच्या रक्तात प्रमाणापेक्षा जास्त थेलियम पदार्थ आढळल्याने त्यांच्यावर मुंबई येथील बाॅम्बे हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पालकमंत्री देशमुख म्हणाले, 'विषबाधेचा तपास योग्यरीतीने सुरू आहे. याबाबत त्यांच्या घरातील सदस्यांशी चर्चा करून चौकशीची मागणी करू. मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन सीआयडी तपासाची मागणी करू.'

बातम्या आणखी आहेत...