आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिली ते आठवीची पायाभूत, नववीची नैदानिक चाचणी रद्द

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- राज्य सरकारने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली पायाभूत चाचणी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली नैदानिक चाचणी परीक्षा रद्द केली आहे. मूल्यमापन चाचणी नियोजनाप्रमाणे शाळास्तरावर घ्यावी, असे विद्या प्राधिकरणाकडून १२ मार्च रोजी कळवले आहे. पायाभूत चाचणीचा अतिरिक्त भार विद्यार्थी व शिक्षकांवर पेपर तपासणीच्या माध्यमातून पडत होता.


शालेय गुणवत्तावाढीसाठी दोन वर्षांपूर्वी या चाचण्या सुरू केल्या होत्या. शालेय पातळीवरील चाचणी एक व दोन परीक्षा असतात. त्यातच शासनाच्या या चाचण्यांमुळे विद्यार्थ्यांना एकाच कालावधीमध्ये दोन परीक्षांना सामोरे जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण पडत होता. मानसशास्त्रानुसार हे अयोग्य होते. तसेच स्वतंत्र कार्यक्षम यंत्रणा नसल्याने प्रश्नपत्रिका वितरण संख्यांचा अभाव हा मोठा प्रश्न निर्माण होत होता.
विद्यार्थ्यांचा एकाच वेळी दोन परीक्षा झाल्याने दोन पेपर तपासणी व कोणते गुण गुणदान करीता घ्यायचे यामुळे एका परीक्षांची विश्वासार्हता निर्माण होत होती. त्यामुळे पालकांकडून देखील पायाभूत चाचणी रद्दची मागणी समोर येत होती.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पायाभूत चाचणी व नैदानिक चाचणीचा पूर्व विचार करून त्या रद्द कराव्यात, असे निवेदन दिल होते. त्या निवेदनावर शिक्षणमंत्री यांनी मागणी रास्त असून, यापुढील चाचण्या रद्द कराव्यात अशी सूचना दिली होती. त्यानुसार त्या रद्द केल्या आहेत. निवेदन सादर करताना आमदार नागो गाणार, नरेंद्र वालकर, किरण भावठाणकर, वेणूनाथ कडे, पूजा चौधरी उपस्थित होते.

 

शिक्षणमंत्र्यांनी मागणी मान्य केली
एकाच टर्ममध्ये दोन परीक्षा असल्याने शिक्षकांवर पेपर तपासणीचा लोड होता. विद्यार्थ्यांनाही गुण धरताना जास्त गुण पडलेल्या पेपरचा विचार व्हायचा. पायाभूत चाचणी रद्द झाल्याने विद्यार्थी एकाच परीक्षेचा एकाग्रतेने अभ्यास करतील. त्यांना चांगले गुण मिळण्यास मदत होईल. शिक्षक परिषदेकडून केलेल्या मागणींना शिक्षणमंत्री तावडे यांनी सकारात्मक दृष्टीने विचार करून पायाभूत चाचणी रद्द केली आहे.”
- जितेंद्र पवार, कार्याध्यक्ष, राज्य शिक्षक परिषद

 

बातम्या आणखी आहेत...