आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपट महोत्सवाचे आज उद्घाटन; दिग्दर्शक मधुर भांडारकर आणि गजेंद्र अहिरे यांची उपस्थिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- प्रिसिजन फाउंडेशन आणि पुणे फिल्म फाउंडेशन आयोजित दुसऱ्या सोलापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा शुक्रवारी (दि.१६) प्रारंभ होणार आहे. प्रख्यात सिनेदिग्दर्शक मधुर भांडारकर व गजेंद्र अहिरे यांच्या हस्ते प्रभात टॉकीज येथे सायंकाळी सव्वासहा वाजता उद््घाटन होईल. 


या महोत्सवाचे यंदा दुसरे वर्ष असून त्याअंतर्गत सोलापूरकरांना २१ आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे. उद््घाटन समारंभावेळी पुणे फिल्म फाउंडेशनचे चेअरमन तथा ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, सोलापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे चेअरमन यतीन शहा व को-चेअरपर्सन डॉ. सुहासिनी शहा, भरत भागवत, दीपक पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या सर्वांच्या उपस्थितीत महोत्सवातील २१ चित्रपटांच्या माहितीपुस्तिकेचे प्रकाशन होणार आहे. 


उद््घाटन समारंभानिमित्त आविर्भाव हा अनोखा कलाविष्कार सादर होणार आहे. यात भारतीय संगीताच्या तालावर पाश्चिमात्य नृत्याचं सादरीकरण होईल. अमित काकडे (बासरी), नागेश भोसेकर (तालवाद्य) आणि श्रीकांत गोचडे यांच्या श्री डान्स अॅकॅडमीचे विद्यार्थी हे अनोखे फ्यूजन सादर करतील.

बातम्या आणखी आहेत...