आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुळाखालील खडी बदलणे पूर्ण, आता प्रतीक्षा 'इंद्रायणी' सुरू होण्याची

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- जेऊर -वाशिंबे दरम्यान १८ किमीच्या रुळाखालील खडी बदलण्याचे काम गुरुवारी संपले. हे काम करण्यासाठी १२५ दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला होता. मात्र सोलापूर विभागाच्या इंजिनिअरिंग सेक्शनने हे काम मुदतीपूर्वीच संपवून टाकले. १२५ दिवसांचे काम १०७ दिवसांत संपविले. त्यामुळे पुणे - सोलापूर -पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रेल्वे प्रशासनाने इंद्रायणी एक्स्प्रेस तत्काळ सुरू केली तर सोलापूरकरांची मोठी सोय होईल. 

 
रुळाखालील खडी बदलण्याच्या कामास १ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. हे काम सकाळी ९.३० ते ११.३५ या वेळेत करायचे ठरल्यानंतर प्रशासनाने पुणे - सोलापूर -पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १ नोव्हेंबरपासून इंद्रायणी एक्सप्रेस १२४ दिवसांची रद्द करण्यात आली. सोलापूरकरांची मोठी गैरसोय होत असल्याने रेल्वे प्रशासनाने ब्लॉकचा कालावधी ३० मिनिटांनी वाढविला. तसेच बीसीएम व टॅपिंग मशिनसारख्या अत्याधुनिक यंत्राची मदत घेऊन सोलापूर विभागाने हे काम १०७ दिवसांत संपविले. यासाठी रोज किमान १०० कर्मचारी काम करायचे. मुदतपूर्व काम संपल्याने रेल्वे प्रशासनाने लवकरच इंद्रायणी एक्स्प्रेसची सेवा सुरू करणे आवश्यक आहे. 
 
रेल्वे प्रशासनाने खडी बदलण्याचे काम संपविले असेल तर तत्काळ त्यांनी इंद्रायणी एक्स्प्रेस सुरू केली पाहिजे. इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द झाल्याने सोलापूरकरांची मोठी गैरसोय झाली आहे. ती जर तत्काळ सुरू झाली तर सोलापूरकरांना मोठा दिलासा मिळेल.
-प्रकाश गायकवाड, अध्यक्ष ,
 
प्रवासी सेवा संस्था 
रुळांच्या सुरक्षेसाठी रुळाखालील खडी बदलणे गरजेचे होते. त्यामुळे खडी बदलण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. गुरुवारी हे काम संपले आहे. उर्वरित दिवसांत जेऊर ते भाळवणी दरम्यान काम करण्याचा विचार आहे.
- डी. डी. लोळगे, वरिष्ठ विभागीय बांधकाम अभियंता, सोलापूर

रुळांच्या सुरक्षेसाठी रुळाखालील खडी बदलणे गरजेचे होते. त्यामुळे खडी बदलण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. गुरुवारी हे काम संपले आहे. उर्वरित दिवसांत जेऊर ते भाळवणी दरम्यान काम करण्याचा विचार आहे.
- डी. डी. लोळगे, वरिष्ठ विभागीय बांधकाम अभियंता, सोलापूर

बातम्या आणखी आहेत...