आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘औज’मधील पाणी आज संपणार, ‘चिंचपूर’चे पाणी 18 दिवस पुरेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन स्रोतांपैकी एक असलेल्या औज बंधाऱ्यात सोमवारी ०.८० मीटर इतका पाणीसाठा आहे. ते पाणी चिंचपूर बंधाऱ्यात घेण्यात येत आहे. मंगळवारी औज बंधारा रिकामा होऊन चिंचपूर बंधाऱ्यात दोन मीटर पाणी राहील. ते पाणी १२ जानेवारीपर्यंत पुरेल. 


दरम्यान उजनी धरणातून पाणी सोडण्यासाठी महापालिकेने सिंचन विभागास पत्र दिले आहे. याबाबत स्मरणपत्र देऊनही अजून निर्णय झालेली नाही. जानेवारीपर्यंत पाणी सोडणे आवश्यक अाहे. तसे झाल्यास आठ दिवसांत पाणी औज बंधाऱ्यात पोहोचेल. असे नियोजन अमलात आल्यास शहरावर जलसंकट निर्माण होणार नाही. औज बंधाऱ्यातून ५५ एमएलडी पाणीपुरवठा होतो. शहराच्या ६० टक्के भागात ते पुरवण्यात येते. 


सिद्धेश्वर यात्रा तोंडावर आहे. उजनी धरणातून वेळेत पाणी सोडण्याचे नियोजन झाले नाही, तर सणासुदीत शहराचा पाणीपुरवठा विस्कळित होण्याचा धोका आहे. औज बंधारा भरून घेण्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडले जाते. सुमारे पाच टीएमसी पाणी सोडल्यास औज बंधाऱ्यात दोन टीएमसी पाणी पोचते. बंधाऱ्यात सुमारे साडेचार मीटर उंचीपर्यंत पाणी भरून घेतले जाते. पाणी सोडण्याचा वेग चांगला राखला तर बंधाऱ्यात पाणी पोचण्यासाठी किमान आठ दिवसांचा कालावधी लागतो. 


महापौरांना पत्र 
महापालिका प्रशासनाने जिल्हाधिकारी, महापौर यांना पत्र देऊन पाण्याबाबत वस्तुस्थिती सांगितली. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमार्फत पाठपुरावा सुरू आहे, असे सांगण्यात आले.

 
नियोजनासाठी दोनदा पत्र दिले आहे 
औजबंधाऱ्यातीलपाणीसाठा संपला असून, उपलब्ध पाणी जानेवारीपर्यंत पुरेल. उजनी धरणातून पाणी औज बंधाऱ्यात जानेवारीपर्यंत पोहोचेल असे नियोजन करून सोडावे, असे पत्र दिले.
- गंगाधर दुलंगे, मनपा सार्वजनिक आरोग्य अभियंता 


तर यात्रा काळात पाणीटंचाई 
सिंचनविभागाने उजनी धरणातून औज बंधाऱ्यासाठी वेळेत पाणी सोडले नाही तर महापालिका काटकसर करून १५ जानेवारीपर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करेल. त्यानंतर मात्र यात्रा काळात शहरावर जलसंकट येण्याची शक्यता आहे. 

बातम्या आणखी आहेत...