आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासणीत गैरहजर १२० कर्मचारी; सीईआेंनी अचानक केली तपासणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- जिल्हा परिषद मुख्यालयात गुरुवारी (दि.१७) सकाळी अचानक घेण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत एकूण ४१० पैकी तब्बल १२० कर्मचारी गैरहजर आढळले. त्या गैरहजर कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन न देण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिले. 


जिल्हा परिषद मुख्यालयातील बिघडलेली शिस्त, दप्तरदिरंगाईमुळे नागरिकांचा त्रास वाढला आहे. त्यामुळे वैतागलेल्या काहींनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी केल्या. गेल्या आठ महिन्यांत दोनदा कारवाई झाली. त्यामुळे 'शिस्त व पारदर्शकता हीच प्राथमिकता' या सीईआे डॉ. भारूड यांची संकल्पना फक्त फलकावर राहिल्याची चर्चा झेडपीमध्ये होती. गुरुवारी सकाळी सव्वादहा वाजता सामान्य प्रशासन व अर्थ विभागातील कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त करून सर्व विभागांतील हजेरी पुस्तिका संकलित करण्यात आली. १७ विभागातील ४१० कर्मचाऱ्यांपैकी १२० कर्मचारी गैरहजर होते. सर्वाधिक १६ गैरहजर कर्मचारी प्राथमिक शिक्षण विभागातील होते. एकूण ३४ कर्मचारी रजेवर, सात कर्मचारी फिरतीवर होते. 

बातम्या आणखी आहेत...