आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोलापूर - शाळकरी मुलीला पळवून नेऊन दुष्कर्म केल्याप्रकरणी सुनीलनगर एमअायडीसी भागात राहणाऱ्या तरुणाला १५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अार. व्ही. सावंत-वाघुले यांनी ही शिक्षा सुनावली.
महिबूब उर्फ तान्या पीरअहमद शाभाई (वय २७, रा. सुनीलनगर) याला शिक्षा झाली अाहे. ३० अाॅक्टोबर २०१५ रोजी ही घटना घडली होती. याबाबत पीडित मुलीने एमअायडीसी पोलिसात तक्रार दिली होती. महिबूब हा मुलीला शाळेला जाताना छेडछाड करायचा. जबरदस्तीने भेटण्याचा प्रयत्न करायचा. घटनेदिवशी त्या मुुलीला दुचाकीवरून जबरदस्तीने पळवून नेऊन चेन्नई, सिकंदराबाद, हैदराबाद अशा विविध ठिकाणी दुष्कर्म केला.
एमअायडीसी पोलिसात अाई-वडिलांनी मुलीबाबत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शोध घेऊन दोघांना सोलापुरात अाणले. पीडित मुलीने घडलेली घटना सांगितल्यानंतर तरुणाला अटक झाली. न्यायालयात दोषारोपपत्र पाठवले. 12 साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलगी, वडील यांची साक्ष महत्त्वाची ठरली. हा गुन्हा सिध्द झाल्यामुळे आरोपीला शिक्षा झाली. तीस हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. त्यापैकी 25 हजार रुपये पीडित मुलीला देण्याचे आदेश आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.