आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर- केंद्रीय रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी यंदाच्या वर्षी बजेटमध्ये नव्या कामांना प्राधान्य न देता जुनीच व रखडलेली रेल्वे मार्गांच्या कामांना प्राधान्य दिले. राज्यात सुरु असलेल्या रेल्वेमार्गाला गती यावी म्हणून मोठया निधींची तरतुद केली आहे. यामुळे रेल्वेची पायाभूत सुविधा बळकट होण्यास मदत मिळणार आहे. तर दुसरीकडे नव्या मार्गांना मंजूरी मिळाली नसल्याने महाराष्ट्रात रेल्वे जाळे विस्तारीकरण होणार नाही.महाराष्ट्रात केवळ मुंबईच्याच वाटयाला एमयुटीपी प्रकल्पासाठी तसेच सीएसएमटी -पनवेल एलिवेटेड कॉरिडोर साठी तब्बल ५४ हजार ७७६ कोटींची तरतुद करण्यात आली. तर राज्यातील उर्वरित रेल्वे मार्गांसाठी २५३३.८५ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली.
नवीन रुळांसाठी ८०० कोटी
मागील वर्षी देशात माेठ्या प्रमाणात रेल्वे अपघात घडले. या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी रेल्वेने अनेक ठिकाणी जुने रुळ बदलण्यावर भर दिला आहे. मध्य रेल्वेत रुळ बदलण्यासाठी ८०० कोटी रुपयांची तरतुद करण्यात अाली अाहे. याशिवाय रेल्वे फाटक काढण्यासाठी ३६.२ कोटी, भुयारी मार्ग व उड्डाणपुलासाठी २७०.४७ कोटी, पुलांच्या कामासाठी ५१.२ कोटी, सिग्नलच्या कामासाठी १३२ कोटींचा निधी मंजूर झाला अाहे.
यंदाच्या बजेटमधून
- अहमदनगर- बीड-परळी वैजनाथ २५० किमी मार्गासाठी : ४२५ कोटी.
- अमरावती- नरखेड १३८ किमी मार्गासाठी : १८ कोटी.
- बारामती -लोणंद ५४ किमी : २ कोटी
- वर्धा -नांदेड व्हाया यवतमाळ - २७० किमी : ३७९ कोटी.
- कराड -चिपळूण ११२ किमी : ३६६.५ कोटी.
- दिघी पोर्ट -रोहा ३३.७६ किमी: २५ कोटी.
- इंदोर -मनमाड व्हाया मालेगाव : ३६८ िकमी १०१ कोटी.
- पुणे -नाशिक २६५ किमी : १० कोटी
- वैभववाडी -कोल्हापूर १०७ किमी : १ कोटी
- पेण -रोहा ४० किमी : ३ कोटी
- गोधनी -कळुमना कॉड लाईन १३.७ किमी : १४ कोटी.
- कल्याण -कसारा तिसरी लाईन ६७.६ किमीस : ११५ कोटी.
- भुसावळ -जळगांव तिसरी लाईन २४ किमी: ५० कोटी
- वर्धा -नागपूर तिसरी लाईन ७६.३ किमी : ४५ कोटी.
तिगांव -चिंचोडा तिसरी लाईन १३.५ किमी: ३५.३५ कोटी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.