आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाणसाच्या हातून न कळत एखादी चूक होते. गुन्हा सिध्द झाल्यास शिक्षाही होते.
यानंतर परिवार, नातेवाइक यांच्यापासून ती व्यक्ती दुरावते. शिक्षा भोगल्यानंतरही त्याला माणूस म्हणून ताठ मानेने जगता यावे यासाठी कारागृह प्रशासन विविध उपक्रम राबवित अाहे. कारागृहातील पन्नास कैद्यांना नवी मुंबईतील टेरगस या कंपनीने पादत्राणे ( बूट) बनविण्याचे काम दिले अाहे. त्याचे युनिटच कारागृहात दिले अाहे. विशेष म्हणजे हे कैदी भविष्यात शिक्षा संपवून बाहेर अाल्यानंतर त्यांना कंपनी अापल्याकडे सामावून घेणार अाहे. तसा करार झाला अाहे. लवकरच ही कंपनी अापली उत्पादने परदेशात पाठविण्यासाठी तयारी करीत अाहेत. कारागृह विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक डाॅ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून हे उपक्रम सुरू अाहेत.
तीस महिला कैद्यांना मिळणार काम
दुचाकी तयार करणारी एक नामांकित कंपनी कारागृहातील महिला कैद्यांकडून दुचाकीची चावी व टूल बाॅक्स तयार करून घेणार अाहे. या कंपनीसोबत करार झाला असून या महिना अखेरीस प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल. सध्या युनिट उभारण्याचे काम सुरू अाहे.
रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न
नवी मुंबईतील पादत्राणे तयार करणाऱ्या कंपनीसोबत करार झाला असून कामही सुरू झाले अाहे. जेव्हा त्या युनिटमधील बंदी बाहेर येतील तेव्हा त्यांना कंपनी अापल्या कंपनीत काम देईल. तसेच महिला कैद्यांनाही एका नामांकीत दुचाकी कंपनीने चावी व टूल किट बनविण्याचे काम दिले अाहे. दोन्ही मिळून ९० ते १०० लोकांना काम मिळेल. माणूस म्हणून त्यांना जगण्यासाठी अाधार देण्याचा प्रयत्न सुरू अाहे.
- यू. टी. पवार, अधीक्षक, येरवडा कारागृह, पुणे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.