आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑर्केस्ट्राच्या नावाखाली तोकड्या कपड्यात सुरू होता अश्लील प्रकार; 9 महिलांंना घेतले ताब्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर- पुणे मार्गावरील केगावजळील न्यू विनय अाॅर्केस्ट्रा बारमध्ये नऊ महिलांना अश्लील हावभाव करताना, तोकड्या कपड्यात गाणे गाताना, काहीजण ग्राहकांना मद्य देत होते, अशा नऊ महिलांसह १९ जणांना पकडण्यात अाले. ही कारवाई फौजदार चावडी पोलिसांकडून शनिवारी मध्यरात्री करण्यात अाली. हा प्रकार पोलिसांना अाजपर्यंत कळला नाही का? पेट्रोलिंग पथक, गस्त पथक नियमीत हाॅटेल तपासात नाहीत का? असे प्रश्न समोर येतात. हा कारवाईचा नुसता फार्स तर नाही ना? 


हाॅटेलातील नऊ महिलांसह १९ जणांना ताब्यात घेऊन नोटीस देऊन सोडल्याची माहिती पोलिसांनी दिली. अशोककुमार मोतीलाल सोनार ( कोलकत्ता), हेमंत सुधाकर भातंद्रेकर ( वय ४०- उमानगरी), बिभीषण गुलाब लोंढे ( वारदचाळ, सोलापूर), शिवशक्ती सन्मुखप्पा हिप्परगी ( रा. माळी गल्ली, चौपाड), परमेश्वर लिंगप्पा कोळी (रा. चंद्रोदयनगर, कुंभारी), बसवराज शिवलिंगप्पा कोळी (वय ३२, जुनी मिल चाळ), मंजूनाथ सूर्यनाथ मैंदर्गी, शिवराज पुंडलीक ससाणे, मनोज मनबहादूर तिखाजी यांच्यावर गुन्हा दाखल झाला अाहे. 


१९ जणांपैकी नऊ महिला अाहेत. कारवाईत ३२ हजार रुपये जप्त करण्यात अाले अाहे. हवालदार हिंदूराव पौळ यांनी तक्रार दिली अाहे. काही महिला नृत्य करीत होत्या. काही जण गाणी म्हणत होत्या. काहीजण ग्राहकांना मद्याचा ग्लास भरून देत होते. काही संशयित संगीत संच वाजवत होते. गेल्या अनेक दिवसांपासून अार्केस्ट्रा बारच्या नावाखाली अश्लील हावभाव करून ग्राहकांना उत्तेजित करण्याचा प्रयत्न होत होता. त्यामुळे कारवाई झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...