आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरिक ऐक्यासाठी मनभेदाच्या पलीकडे जाऊन संवाद साधावा; आ. ह. साळुंखे यांचे प्रतिपादन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- समाजशास्त्र हे समाजाशी प्रत्यक्ष नाते जोडणारे शास्त्र. भारतातील समाजशास्त्रीय मन विविध वैविध्य, अस्मिता, भेद आणि एकोपा यातून तयार झालेले असणे स्वाभााविक आहे. म्हणून या भेदाच्या पलीकडे जात देशातील आंतरिक ऐक्य टिकवायचे असेल तर मनभेदाच्या पलीकडे जात संवाद साधला गेला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आ. ह. साळुंखे यांनी आज येथे केले. 


वालचंद महाविद्यालयात आयोजित समकालीन समस्या आणि सामाजिक शास्त्रासमोरील आव्हाने या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा झाली. याचे उद््घाटन आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वालचंद शिक्षण संस्थेचे विश्वस्त भूषण शहा होते. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. चंद्रकांत चव्हाण, समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. धनराज पाटील, राज्यशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. सिद्राम सलवदे यांची प्रमुख उपस्थिती होती. 


श्री. साळंुखे म्हणाले, 'समाजशास्त्र हा सर्व विषयांचा ज्ञानपाया आहे. अर्थशास्त्र असो, फिजिक्स की इतर शास्त्र. समाजाच्या विकासासाठी ही विविध शास्त्रांचा उपयोग होतो. आपण अभ्यासाच्या सोयीसाठी याची विविध शास्त्रात विभागणी केलेली आहे. खरे तर ज्ञानक्षेत्रात विभागणी करता येत नाही. सर्व शाखा या ज्ञान शाखा ठरतात, त्यांची एकमेकांशी निकटताही असते. विज्ञानवादी, विवेकी व विधायक उद्दिष्टांसाठी शास्त्रांचा उपयोग होतो. इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र आदींच्या अभ्यासानेच विधायक समाजाची निर्मिती व विकास साध्य होऊ शकेल. यासाठी नवविचार अंगिकारत समाजाला उन्नत व प्रगत वैचारिक दिशा देणेही शक्य होते.' प्रा. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. ए. बी. गायकवाड यांनी परिचय करून दिला. प्रा. एम. पी. जोशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एस. जे. निला यांनी आभार मानले. 


वालचंद महाविद्यालयात आयोजित सामाजिक शास्त्र विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेचे उद््घाटन ज्येष्ठ विचारवंत आ. ह. साळुंुखे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी विश्वस्त भूषण शहा, प्रभारी प्राचार्य डॉ. चंद्रकांत चव्हाण, डॉ. सिद्राम सलवदे, डॉ. धनराज पाटील आदी. 


नवसमाज निर्मितीची प्रक्रिया निरंतर व्हावी 
विवेकबुद्धीच्या जोरावर नवविचार मांडून समाजाला वैचारिक दिशा दाखविण्याचे कार्य श्री. साळुंखे यांनी केले. आपल्या लेखणी, क्रियाशील विचारांद्वारे त्या दिशेने ते सातत्याने प्रयत्नशील राहिले. त्यांच्या विचाराला समजून घेत नवसमाज निर्मितीची प्रक्रिया युवकांसमोर मांडली जावी. यातून समाजसमस्या सोडविण्यात तरुणांना चालना मिळेल, अशी अपेक्षा डॉ. चव्हाण यांनी व्यक्त केली. 

बातम्या आणखी आहेत...