आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलमित्रांनो, जलसंधारणासह मनसंधारणासाठी सक्रीय व्हा; अभिनेते गिरीश कुलकर्णी यांचे आवाहन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी राज्यव्यापी जलमित्र मोहीम पाणी फाउंडेशनतर्फे राबवण्यात येतीय. जलसंधारणाबरोबर मनसंधारणासाठी १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजिलेल्या 'महाश्रमदान' अभियानमध्ये सोलापूरकरांनी सक्रीय व्हावे, असे आवाहन अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी केले. 


सत्यमेव जयते वॉटर कप २०१८ स्पर्धेची सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील कामांची पाहणी, सहभागींना व जलमित्रची नोंदणी केलेल्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सोमवारी श्री. कुलकर्णी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत श्री. कुलकर्णी बोलत होते. 


ते पुढे म्हणाले, राज्यातील २४ जिल्ह्यांमधील चार हजारांपेक्षा जास्त गावातील लाखो गावकरी, शेतकरी, अबालवृद्ध स्वत:चे गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी सक्रीय झालेत. वॉटर कप स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष असून, गेल्या दोन वर्षात अंदाजे दीड हजार गावांनी सहभाग नोंदवला होता. त्यामाध्यमातून दहा हजार कोटी लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण केली आहे.


दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी आखलेल्या 'जलमित्र' मोहिमेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी 'जलमित्र पाणी फाउंडेशन' या संकेतस्थळावर २५ एप्रिलपर्यंत नोंदणी करावी. यंदाच्यावर्षी १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त सकाळी सहा ते दहा व सायंकाळी सात ते सात वाजेपर्यंत महाश्रमदान होणार आहे. जलमित्रची नोंदणी केलेल्या इच्छुकांनी त्या अभियानामध्ये सक्रीय व्हावे. सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या शहरातील अनेकजण ग्रामीण भागात श्रमदानसाठी गेले. 


त्यानिमित्ताने अनेकांना नवीन गाव, तेथील नवीन आेळखी व त्यातून नातेसंबंध प्रस्थापित झाले. 'श्रमप्रतिष्ठा' गेल्या काही वर्षात कमी होतीय. पुन्हा एकदा श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्याबरोबर आपलं शिवार दुष्काळमुक्त करावे. समाजसेवेचे ऋण फेडण्यासाठी शहरातील मान्यवरांनी सक्रीय व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. 


जिल्ह्यात सहा तालुके अभियानात सक्रीय 
सोलापूर जिल्ह्यातील ११ पैकी सहा तालुक्यांमध्ये पाणी फाउंडेशनचे कार्य सुरू आहे. २४२ गावांंचा सक्रीय सहभाग घेतला असून दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी अबालवृद्ध झटत असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...