आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेलापूर जिल्ह्यात सशस्त्र दरोडा; तीन लाखांचा ऐवज लुटला; दोन वृद्ध जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेंभुर्णी- चौभेपिंपरी (ता. माढा) येथील देवकर वस्तीवर अज्ञात सहा दरोडेखोरांनी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चाकू, कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण करून तीन लाखांचा ऐवज लुटला. या मारहाणीत दोन वृद्ध जखमी झाले. चोरट्यांच्या विरोधात टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
 
सुनील देवकर यांच्या घरातील लाेक मध्यरात्री झाेपेत असताना सहा चोरट्यांनी लाकडी दाराचा कडीकोयंडा काढून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरात प्रवेश करताच फिर्यादीचे वृद्ध वडील किसन एकनाथ देवकर व आई विमल यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. तसेच चाकू व कुऱ्हाडीचा धाक दाखवून घरातील लोखंडी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, रोख ७० हजार रुपये व एक मोबाइल असा एकूण २ लाख ९१ हजार ९०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. जाताना चाेरटे लोखंडी पेटी घेऊन गेले. यात देवकर कुटुंबाच्या घरातील महत्त्वाची कागदपत्रे आहेत. 
बातम्या आणखी आहेत...