आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तेसाठी भाजप दंगली घडवेल, युद्धही लादेल : अॅड. प्रकाश आंबेडकर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर- देशात दोन समाजांत तेढ निर्माण करून दंगली घडवल्या जातील. युद्ध लादून सैनिकांना शहीद करण्याचे कामही होईल. यातून आम्ही शांतता राखण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र भाजप निर्माण करेल. भाजप सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणारा पक्ष आहे, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. धनगर आरक्षणासंदर्भात रविवारी आयोजित मेळाव्यासाठी अॅड. आंबेडकर येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 


आंबेडकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुकाबला फक्त माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हेच करू शकतात. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आणखी राजकीय शिक्षणाची गरज आहे. काँग्रेसला पुन्हा सत्तेत यायचे असेल, तर लहान पक्षांना एकत्र घ्यावे लागेल. मात्र, त्यांनी कर्नाटकच्या निवडणुकीतून बोध घेतल्याचे दिसून येत नाही. काँग्रेस पक्ष बदलत नसेल तर, तिसरा पर्याय निर्माण होईल. कर्नाटकातील काँग्रेस व जेडीएस यांचे सरकार स्थिर नाही. पुढील तीन महिन्यांमध्ये वेगळेच चित्र पाहायला मिळणार आहे. 


भाजपला संविधान बदलण्याची शेवटची संधी
भाजपला संविधान बदलायचे आहे. त्यामुळे ते सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार असल्याचे कर्नाटकच्या निवडणुकीनंतर दिसले आहे. २०१९ ची निवडणूक भाजपसाठी संविधान बदलण्याची शेवटची संधी आहे. यामुळे २०१९ पूर्वी अनेक प्रकार दिसून येतील. मात्र, त्यांचे मनसुबे पूर्ण होऊ न देण्यासाठी समविचारी पक्षांनी देशपातळीवर एकत्र येण्याची गरज असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले. 


इतरांना आरक्षणास आमचा विरोध नाही 
घटनेत तरतूद असलेल्या इतर समाजांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा, मुस्लिम, धनगर, लिंगायत समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. त्यांना आरक्षण मिळावे, यासाठी आम्ही प्रयत्न करू. यापुढे अलुतेदार व बलुतेदरांना बरोबर घेऊन सत्ता संपादन करणार आहे. सत्तांतरानंतर बारा बलुतेदारांचे प्रश्न सोडवत असताना, बहुजन समजाला सोबत घेणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...