आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखरपुडा झाला अन् लग्न मोडले, एकाच कुटुंबातील तीन पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सेटलमेंट येथील एका तरुणीचा केशवनगर पोलिस लाइनमध्ये राहणाऱ्या पोलिस तरुणाबरोबर साखरपुडा झाला. साखरपुड्यात मानपान झाला. मुलाला साेनेही देण्यात आले. तरीही मुलाकडून हा साखरपुडा मोडण्यात आला. त्यानंतर मुलीच्या आईने फिर्याद दिली. त्यावरून पाच जणांविरुद्ध सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील तिघे पोलिस कर्मचारी आहेत. 


मंगल रामजी काळे (वय ४०, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर १) यांच्या मुलीचा सचिन पवार या पोलिस तरुणाशी २१ ऑगस्ट २०१६ रोजी कविता नगर पोलिस लाइन येथे थाटात साखरपुडा झाला. या सोहळ्यात मुलाला सोन्याची एक तोळ्याची अंगठी देण्यात आली. साखरपुड्याचा खर्च साधारण एक लाख रुपये झाला. साखरपुड्यानंतर दोन्ही कुटुंबात येणे -जाणे सुरू झाले. एके दिवशी सचिन पवार त्याच्या कुटुंबीयांनी मुलीच्या घरच्यांना बोलावून घेतले. लग्नाचा संपूर्ण खर्च, हुंडा, एक फ्लॅटची मागणी केली. त्यावर मुलीच्या आईने एवढा खर्च होणार नाही, असे सांगितले. त्यावर मुलाच्या लोकांनी मग तुमची मुलगी तुमच्या घरात ठेवून घ्या, असे उत्तर दिले.


या लोकांनी फसवणूक केल्याची फिर्याद मंगल काळे यांनी सलगर वस्ती पोलिस ठाण्यात दाखल केली. त्यावरून सचिन राजस्थान पवार (पोलिस कॉन्स्टेबल), राजस्थान पवार (पोलिस हेड कॉन्स्टेबल, दोघांची नेमणूक ग्रामीण मुख्यालय), प्रिया राजस्थान पवार (पोलिस कॉन्स्टेबल, नेमणूक ग्रामीण मुख्यालय), नंदाबाई राजस्थान पवार, नितीन राजस्थान पवार (रा. केशव नगर पोलिस लाइन) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...