आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोठे, सपाटे, देशमुख यांच्या संस्थांना दबावामुळे दिल्या जमिनी -बिल्डर कुमार करजगी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- कामगारांच्या हक्काची जमीन असलेल्या जुनी मिल कंपाऊंडमध्ये (कै.) विष्णुपंत कोठे, मनोहर सपाटे आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा शिरकाव झाला. राजकीय दबावामुळे त्यांच्या संस्थांना जमिनी द्याव्या लागल्या. कामगारांना काही मिळवून देण्याच्या उद्देशाने मला हे सारे पाहूनही गप्प बसण्याशिवाय मार्ग नव्हता. एवढे होऊनही त्यांनी पोलिसांवर दबाव आणून मला ८ महिने तुरुंगात बसवले. त्यामुळे मला अाता तोंड उघडावे लागत आहे, असा आरोप कामगार नेता तथा बिल्डर कुमार करजगी यांनी केला आहे. 


जुनी गिरणीची जमीन मातीमोल किमतीत घेण्याचा या मंडळींचा डाव होता. तो हाणून पाडल्याची सल त्यांच्या मनात होती. देशपांडे नावाच्या व्यक्तीला पुढे करून त्यांनी पोलिसांपर्यंत हे प्रकरण नेले. पोलिसांनीही कुठली शहानिशा न करता, मला अटक केली. पुढे मला आठ महिने तुरुंगात बसावे लागले, असेही त्यांनी नमूद केले. पत्रकारांसमोर हे स्पष्टीकरण देताना त्यांनी काही कागदपत्रेही दाखवली. गिरणीच्या जागेवर महापालिकेने १४ आरक्षणे टाकली. त्यानंतर उठवण्याचा ठराव झाला. त्याच्या इतिवृत्तात 'शाळा सोडून' असा उल्लेख आला. इतिवृत्तातील ही खाडाखोड कुणी केली? तेव्हा महापालिकेत कोण मातब्बर होते? हे सांगताना कोठे आणि सपाटे यांच्या नावावर त्यांनी जोर दिला. सुभाष देशमुख मंत्रिपदी आल्यानंतर त्यांच्या कारवाया वाढल्या, असे ते म्हणाले. 


तात्या हयात नसताना असे आरोप चुकीचे 

नगरसेवक महेश कोठे म्हणाले की, खरे पाहता, करजगी यांनी तात्या (विष्णुपंत कोठे) हयात असताना असे आरोप केले असते तर त्यावर योग्य स्पष्टीकरण मिळाले असते. आता ते नसताना कुठलाही संदर्भ घेऊन बेछूट अारोप करण्यात काय अर्थ आहे? करजगी यांच्याबाबत नेमके काय घडले मला माहीत नाही. माझ्याबद्दल बोलत असतील तर मला लोक चांगले आेळखतात. मी असले घाणेरडे राजकारण कधीच केले नाही. करणारही नाही. 


सहकारमंत्री फक्त हसले
याबाबत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनाही संपर्क केला. करजगी यांचे आरोप सांगितले. त्यावर ते फक्त हसले. काहीच प्रतिक्रिया नोंदवली नाही. 


करजगींच्या दोन वर्षे अगोदर जागा घेतली 
एक कामगार पुत्र म्हणून जुनी गिरणीची जागा घेण्याच्या स्पर्धेत मीही होतो. न्यायालयामार्फत झालेल्या लिलावात मला जमीन मिळाली असती, पण करजगी यांनी मृत मुलाची शप्पथ घेऊन माघार घ्यायला लावली. त्यानंतर आरक्षण उठवण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्या वेळी उच्च न्यायालयात रिट दाखल करून यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाला जमीन घेतली. त्या वेळी करजगी यांना अजून जागा मिळायची होती. 
- मनोहर सपाटे, माजी महापौर 

बातम्या आणखी आहेत...