आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभागृह नेत्याच्या मुलाची चेन हिसकावली; तिघांना पोलिस कोठडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- एमअायडीसी परिसरातील सग्गमनगरातून दुचाकीवरून जाताना रिक्षा बाजूला घे म्हटल्याच्या कारणावरून नागनाथ मरीगंगा कंटीकर (रा. घोंगडेवस्ती) त्यांचा मित्र बिपीन पाटील यांना मारहाण करून दोघांजवळील दीड लाख किमतीचे दागिने तिघांनी पळवले. ही घटना सोमवारी रात्री घडली. नागनाथ यांनी एमअायडीसी पोलिसात तक्रार दिली अाहे. महापालिका सभागृह नेते सुरेश पाटील यांचा मुलगा बिपीन पाटील असून त्यांच्या गळ्यातील चेन काढून घेण्यात अाले अाहे. 


दरम्यान, जावेद शेख, तरबेज अ. रहिम सगरी, इन्नूस अजमुद्दीन शेख यांना अटक झाली असून मंगळवारी तिघांना न्यायालयाने तीन िदवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे अादेश दिले अाहेत. अन्य दोघांचा शोध सुरू अाहे. नागनाथ बिपीन दोघेजण दुचाकीवरून जाताना रिक्षा बाजूला घेण्याच्या कारणावरून हा प्रकार घडला होता. याबाबत पोलिस निरीक्षक कमलाकर पाटील यांना विचारले असता, चौकशीत अाणखी माहिती समोर येईल, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...