आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यवस्थापन कोट्यातून एमबीबीएसला प्रवेश देण्याचे आमिष दाखवून 28 लाखांना गंडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- व्यवस्थापन कोट्यातून एमबीबीएसला प्रवेश देण्याचे आमिष दाखवून एकाला २८ लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना सोलापूर येथे गुरुवारी  उघडकीस आली. याप्रकरणी सीताराम डोंगरे यांनी तक्रार दिल्यानंतर संदीप शहा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


डोंगरे यांच्या मुलीला एमबीबीएसला प्रवेश घ्यायचा होता. काही दिवसांपूर्वी डोंगरे यांचा शहा याच्याशी संपर्क झाला. या वेळी त्याने व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश देण्याचे सांगून डोंगरे यांच्याकडून चार टप्प्यात २८ लाख रुपये घेतले. मार्च २०१६ मध्ये शहा याने डोंगरे यांना फोनवरून तुमच्या मुलीचा एमएचटीसीईटीची ऑनलाईन फॉर्म भरला आहे. तुम्ही फॉर्म भरू नका व हॉल तिकिट परिक्षेच्या आधी येऊन घेऊन जा, असे सांगितले. ५ मे २०१६ रोजी डोंगरे यांच्या मुलीने परीक्षा दिली व त्याचा निकाल १ जून २०१६ लागल्याने शहा याच्याकडे पासवर्ड विचारण्यात आला. तेव्हा त्याने डोंगरे यांना तुमचे काम होईल नाहीतर होणार नाही, असे सांगितले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डोंगरे यांनी फसवणूक करणाऱ्या शहाविरोधात पोलिसांत तक्रार दिली. 

बातम्या आणखी आहेत...