आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

108 फुटी लिंगोद्भव मूर्तीचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- अक्कलकोट रोडवरील चन्नवीर नगरीत गेल्या १० दिवसांपासून सुरू संकल्पसिद्धी कार्यमहोत्सव सुरू आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १०८ फुटी लिंगोद््भव मूर्तीचे लोकार्पण होणार आहे. यावेळी भरणाऱ्या वीरशैव लिंगायत संमेलनास त्यांची प्रमुख उपस्थिती असेल. 


लोकार्पण सोहळ्याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार शरद बनसोडे, महापौर शोभा बनशेट्टी, माजी आमदार दिलीप माने, बसवराज पाटील, आ.मधुकर चव्हाण, आमदार प्रणिती शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, विश्वनाथ चाकोते, शिवशरण पाटील आदी मान्यवर उपस्थित असतील. यावेळी ५० मठाचे मठाधिपती शिवाचार्यगण उपस्थित राहणार आहेत. 


चरित्रग्रंथाचे झाले प्रकाशन
गुरुवारी सकाळी रंभापूरी, उज्जैन, श्रीशैल आणि काशी जगदगुरुंच्या हस्ते व पालकमंत्री विजयकुमार देशमुख, कार्याध्यक्ष आमदार सिद्धाराम म्हेत्रे, होटगी मठाचे मठाधिकारी डॉ. मल्लिकार्जून शिवाचार्य महास्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामींच्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. 


२ तासांचा असेल दौरा
सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांचे मंुबईहून विमानाने सोलापूर विमानतळावर आगमन होईल. मोटारीने वीरतपस्वी मंदिर येथील कार्यक्रमस्थळी रवाना होतील. दुपारी १२.४५ वाजता कार्यक्रमानंतर सोलापूर विमानतळाकडे व १ वाजता विमानाने मुंबईला प्रयाण करतील. 


अाज लक्ष दीपोत्सव
व्यासपीठाच्या समोरील बाजूस सामुदायिक विवाह सोहळ्यातील जोडप्यांसाठी व्यासपीठ तयार करणयात आले आहे. शुक्रवारी सायंकाळी लक्ष दीपोत्सवाने या संकल्पसिध्दी कार्यक्रमाचा समारोप करण्यात येत आहे. 


विद्यापीठ नामांतरासाठी काळे झेंडे दाखवणार 
वीरशैव लिंगायत संमेलनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोलापूर विद्यापीठाला शिवयोगी सिद्धरामेश्वरांचे नाव देण्याची घोषणा करावी, अशी विनंती करण्यात येत आहे. अशी घोषणा झाली नाही तर कांचन फाउंडेशनच्या वतीने त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा इशारा संस्थापक अध्यक्ष सुदीप चाकोते यांनी पत्रकार परिषदेत दिला. 

बातम्या आणखी आहेत...