आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार अडवून तलवार, कुऱ्हाडीने चौघांवर प्राणघातक हल्ला; चौघांवर गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- रामवाडी परिसरात राहणाऱ्या मित्राला सोडण्यासाठी गेल्यानंतर चौघांनी मिळून चौघा तरूणांवर तलवार, कुऱ्हाड, सळईने प्राणघातक हल्ला केला. तसेच, २३०० रुपये दोन मोबाइल काढून घेतले. ही घटना रविवारी मध्यरात्री एकच्या सुमाराला घडली. सलगरवस्ती पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल झाला अाहे. अविनाश बाबूराव बिराजदार (वय ३८, रा. सैफुल), राहुल धावड (रा. आदित्यनगर), ईरण्णा नुला (रा. रामवाडी), गुरुनाथ पांढरे (रा. दोन नंबर झोपडपट्टी, सोलापूर ) हे चौघे जखमी अाहेत. 


चौघांसह अाणखी काही मित्र एकत्रित रात्री जेवायला गेले होते. जेवणानंतर एका मित्राला रामवाडी परिसरात सोडण्यासाठी वरील चौघेजण दुचाकी ओमिनी कारमधून (एम एच १३, एन ९३२६) रामवाडी दवाखान्यासमोरून मध्यरात्री एकच्या सुमारास जात होते. कारमध्ये बिराजदार धावड तर दुचाकीवर नुला अाणि पांढरे होते. चौकात अाल्यानंतर चौघेजण तरुण जवळ अाले तुम्ही कुठले, कुठल्या पक्षाचे असे विचारून शिवीगाळ सुरू केली. थेट मारहाण करू लागले. तलवार, कुऱ्हाड रॉडने वार करण्यात अाले. कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले. 


जखमी नुला यांनी मारहाण करणाऱ्या तरुणाला ओळखले आणि त्याने फोन लावून आपल्या भावाला बोलावले. भावानेही त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही धक्काबुक्की केली. मारहाण करीत २३०० रुपये आणि दोन मोबाइल घेऊन दोघे दुचाकीवरून तर दोघे पळून गेले. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू अाहेत. सलगरवस्ती पोलिसात बिराजदार यांनी फिर्याद दिली अाहे. आकाश ऊर्फ आक्या जाधव (रा. पटवर्धन चाळ), सोन्या सिद्राम आयवळे (रा. धोंडिबा वस्ती, रामवाडी) यांच्यासह अन्य दोघा अनोळखी तरुणांवर गुन्हा दाखल झाला. सहाय्यक पोलिस निरीक्षक कुंभार तपास करीत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...