आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू; वरातीच्या दिवशी अंत्ययात्रा, ट्रॅक्टरने चिरडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- घरात लग्नाच्या सर्व तयारी झालेली, पाहुणे मंडळीही अालेली... अवघ्या काही तासांतच त्याचे ‘दाेनाचे चार’ हाेणार हाेते. मात्र बर्गे परिवाराच्या या अानंदी क्षणावर काळाने घाला घातला. लग्नाच्या दिवशी माॅर्निंग वाॅकला गेलेल्या गणेश बर्गे या तरुणाचा बुधवारी सकाळी अपघातात मृत्यू झाला. ज्या दिवशी लग्नाची वरात काढायची त्या दिवशीच गणेशची अंत्ययात्रा काढण्याची दुर्दैवी वेळ बर्गे परिवारावर अाली.   


सातारा जिल्ह्यातील काेरेगावात राहणाऱ्या गणेश बर्गे (२४) याचे बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास शहरातच लग्न हाेते. त्यासाठी चार-सहा दिवसांपासूनच त्याच्या घरात धामधूम सुरू हाेती.  उत्साही नातेवाईक व मित्रमंडळींनी मंगळवारी रात्रीच गावातून गणेशची घाेड्यावरून मिरवणूकही काढली. मंगळवारी रात्रभर घरात लग्नाचीच तयारी सुरू हाेती. सर्व जण उत्साहात हाेते. गणेश राेज सकाळी फिरायला जात असे. लग्नाच्या दिवशीही त्याने अापला दिनक्रम माेडला नाही. पहाटेच्या वेळी ताे सवयीनुसार घराबाहेर पडला. मात्र घरापासून काही अंतरावर जात नाही ताेच ट्रॅक्टर ट्राॅलीने त्याला चिरडले. यात गणेशचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळताच कुटुंबीयांना तातडीने घटनास्थळी धाव घेऊन त्याला रुग्णालयात नेले, मात्र ताेपर्यंत फार उशीर झाला हाेता. डाॅक्टरांनी त्याला तपासून मृत घाेषित केले.   


बर्गे कुटुंबातील गणेश एकुलता एक मुलगा. वडिलांचे बारा वर्षांपूर्वीच निधन झाले हाेते. अाईने त्याच्या दाेन बहिणींची लग्ने लावून दिली हाेती. गणेशचेही लग्न धूमधडाक्यात लावण्याची तयारी केली हाेती. मात्र ज्या मांडवातून गणेशची वरात निघणार हाेती तिथून त्याची अंत्ययात्रा काढण्याची वेळ अाली.

बातम्या आणखी आहेत...