आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृदयाची वाढ न झालेले बाळ दगावले, चिमुकलीचे देहदान; पालकांचा खंबीर निर्णय...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- नऊ महिने पोटात वाढवून, स्पंदनांचा वेध घेणाऱ्या आपल्या पोटच्या गोळ्याला   पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करून अलविदा करणे हे मान्य होत नव्हते. त्यापेक्षा  प्रयोगशाळेला दान करणं ही संकल्पना  श्रेष्ठ वाटली. कारण तिच्या देहावर संशोधन करून भविष्यकाळात  इतर बाळांना ‘तिचा’ नक्कीच उपयोग होईल असे वाटते... अशा   मन  हेलावून टाकणाऱ्या भावना  बाळाला जन्म देणाऱ्या  अाई अनुश्री व वडील प्रसाद मोहिते यांनी व्यक्त केल्या. हे बोलत असताना  सारं काही शांत होतं, मात्र अनू आणि प्रसादचे डोळे  बोलत होते, तेही अश्रूंनी...


बुधवारी सकाळी  सोलापुरातील युनिक  हॉस्पिटलमध्ये  अनुश्रीच्या पोटी जन्माला आलेल्या  बाळाच्या  हृदयाची वाढ न झाल्यानं ते पोटातच दगावले. अनू आणि  प्रसादला आठव्या महिन्यात  त्यांच्या  बाळाच्या हृदयाचा विकास झालेला नाही आणि  बाळ जन्माला आल्यानंतरही जास्त दिवस जगणार नाही याची कल्पना रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली होती. मात्र , परिस्थितीशी लढा देऊन आपण  बाळाला वाढवू असा संकल्प या  दांपत्याने केला. पण कदाचित दोघांच्याही नशिबात काही  तरी वेगळेच लिहिलेले होते. अचानक पोटात दुखायला लागले. त्यानंतर मंगळवारी अनुश्रीला  शहरातील युनिक  हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्या वेळी पोटातले बाळ दगावले आहे, असे डाॅ. अजित गांधी यांनी  त्यांना सांगितले.  त्यानंतर खरा संघर्ष सुरू झाला आणि काही वेळाच्या चर्चेनंतर निर्णय देहदानापर्यंत येऊन पोहोचला.  वंचितांची शाळा चालवणाऱ्या या दांपत्याने आपल्या बाळाचा समाजासाठीही वाटा व्हावा म्हणून   अश्विनी ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्राला संपर्क साधून संपूर्ण कायदेशीर कारवाई पूर्ण  करून आपल्या कन्येला सोपवले. दरम्यान, या घटनेनंतर या दांपत्याचे कुटुंबीय आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना गहिवरून आले.

 

निर्णय कौतुकास्पदच
१५ पंधरा दिवसांपूर्वी हे जोडपे माझ्याकडे आले.  त्यांच्या बाळाच्या हृदयाला ईव्ही कॅनॉल  डिफेक्ट होता. डाव्या आणि उजव्या बाजूला दोन स्वतंत्र वेगवेळ्या झडपा असतात. मात्र या बाळाच्या हृदयाला एकच कॉमन झडप होती. शिवाय  फुप्फुसाला जाणारी नस तयारच झालेली  नव्हती. त्यामुळे विषय किचकट होता. मात्र बाळाला प्रयोग शाळेला डोनेट करण्याचा त्यांचा निर्णय कौतुकास्पद आहे.’ 
- डॉ. अजित गांधी, स्त्रीरोग व प्रसूतितज्ञ 

 

हा निर्णय अभिनंदनीय  
‘मनावर दगड ठेवून आपल्या पोटच्या बाळाला प्रयोगशाळेसाठी असे देणे हे धाडसाचे आहे . त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे निश्चितच मोल होईल. अभ्यासाकरिता हा विषय महत्त्वाचा ठरेल.’ 
- डाॅ. माधवी रायते, डीन, अश्विनी ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र, सोलापूर

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा संबंधित फोटो...

 

 

बातम्या आणखी आहेत...