आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवजयंती उत्सव डाॅल्बीमुक्त करण्याचा मंडळांचा निर्णय; पोलिस अायुक्तालयात बैठक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शिवजयंती उत्सव १२ ते १९ फेब्रुवारी या दरम्यान उत्साहात साजरा होणार अाहे. मिरवणुकीत कुणीही डाॅल्बी लावणार नाही, असा निर्धार मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केला. पोलिस प्रशासनानेही डाॅल्बीऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, अशा सूचना दिल्या. 


शुक्रवारी पोलिस अायुक्तालयात मध्यवर्ती मंडळ व शिवजयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांंसोबत बैठक झाली. पोलिस अायुक्त महादेव तांबडे, महापालिका नगरअभियंता लक्ष्मण चलवादी, उपायुक्त अर्पणा गीते यांची प्रमुख उपस्थिती होती.

 
मंडळांनी परवानगी घेताना मागील वर्षांचा परवाना दाखवण्याची गरज अाहे. मंडपाच्या िनयमाचे पालन करा. लेझीमचे पारंपरिक खेळ सादर करा. पोलिस अापल्यासोबत अाहेत. उत्सव शांततेत व कायद्याच्या चौकटीत राहून साजरा करा, असे अावाहन श्री. तांबडे यांनी केले. 


मिरवणूक मार्गावर अनावश्यक गतिरोधक काढण्यात येतील. शिवाजी चौकात ड्रेनेज तुंबणार नाही याची काळजी घेतली जाईल. अतिक्रमणही हटविण्यात येतील. पथदिवे चालू राहतील, स्वच्छता राखली जाईल, असे अाश्वासन श्री. चलवादी यांनी दिले. 


उत्सव शांतेत साजरा होईल. कुणावरही गुन्हा दाखल होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष रसुल पठाण यांनी सांगितले. त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात अाला. सहायक अायुक्त शर्मिष्ठा घारगे यांनीही सूचना दिल्या. सहाय्यक अायुक्त दीपाली काळे यांनी सूत्रसंचालन केले. 


कार्यकर्त्यांची मागणी
विविध मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी डाॅल्बी लावणार नाही, असे मत व्यक्त केले. मनपाने रस्त्यांची स्वच्छता नियमित करावी. पथदिवे चालू ठेवावेत. अतिक्रमण काढा. गतिरोधक हटवा, परवाना देताना सुटसुटीतपणा ठेवा अशी मागणी केली. 


बैठकीस यांची होती उपस्थिती
दास शेळके, सुनील रसाळे, दिलीप कोल्हे, शाम कदम, विजय पुकाळे, प्रताप चव्हाण, विशाल शिंदे, हणमंतु श्रीराम, दीपा शिंदे, महेश धाराशिवकर, किरण पवार, अारती हुल्ले आदी उपस्थित होते. 


शिवाजी चौकातील अतिक्रमण काढून टाका 
शिवाजी चौकातील अतिक्रमण काढून टाका. रिक्षाचालकांना शिस्तीत व रांगेत थांबण्यासाठी सूचना द्या. अन्य वाहने बराच काळ एकाच ठिकाणी थांबणार नाहीत याची काळजी घ्या. कुणी नियम तोडत असतील तर थेट कारवाई करण्याचे अादेश पोलिस उपायुक्त गीते यांनी फौजदार चावडी पोलिस निरीक्षक संजय जगताप व वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना दिले. 

बातम्या आणखी आहेत...