आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोलापूर- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आयोजित आंबा महोत्सवात यंदा केवळ आणि केवळ परगावचे विक्रेते आलेले आहेत. स्थानिकांना एकही स्टॉल देण्यात आलेला नाही. त्यामुळे जातिवंत आंबे येथे योग्य दरात मिळत आहेत. स्थानिक विक्रेते याच परगावच्या विक्रेत्यांकडून हे आंबे घेऊन त्यांचे कमिशन लावून विकतात. परंतु या आंबा महोत्सवात थेट उत्पादक ते ग्राहक ही संकल्पना राबविण्यात आल्याचे दिसून आले आहे.
महोत्सवात कोकणातील रत्नागिरी, देवगड, चिपळूण यासह जिल्ह्यातील जातिवंत आंबा उत्पादक सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे केवळ आंबाच नाही, तर कोकणातील विविध फळांचा गर, पावडर तसेच वाळवलेले पदार्थ येथे अल्प दरात विक्रीस आलेले आहेत. देवगडचा नितीन वारीक यांचा हापूस ६०० रुपयांपासून १ हजार २०० रुपये डझनपर्यंत आहे. तसेच चिपळूणच्या मोरे यांनी ४५० रुपयांचा रत्नागिरी हापूस विक्रीस आणला आहे. यासह जिल्ह्यातील आंबा उत्पादकांचेही स्टॉल आहेत. तसेच पिठले भाकरी करण्याचे कुळीथाचे पीठ नावाचा कोकणातील एक खाद्यपदार्थ व त्याचा कच्चा माल ही येथे विक्रीस आलेला आहे.
हे आहे विशेष
या महोत्सवात देवगडच्या एकमेव महिला विक्रेत्या रेश्मा दोशी आल्या आहेत. त्या स्वत: आंबा बागायतदार असून देवगड हापूस हे त्यांचे मागील २० वर्षांपासूनचे वाण असल्याचे ते सांगतात. मुंबई, पुणे प्रमाणेच सोलापुरातही मागील दोन वर्षांपासून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्या सांगतात. संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतात.
असे आहेत दर
देवगड - ६०० ते १ हजार, डझन
केशर आंबा - २०० रुपये किलो
केशर आंब्याचे झाड - १०००
चिंचबोळ - ४० रुपये पाकीट
फणसाचे वाळवलेले गर, वेफर्स - ५० रुपये पाकीट
आमसूल पावडर - ४० रुपये
कोकम सरबत - १५० रुपये लिटर
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.