आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रुटींची पूर्तता व दोषींवर कारवाई करून एप्रिलअखेर द्या अहवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- विकासाच्या कल्याणकारी योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागापर्यंत पोहचवण्यात येतात. शिक्षण, पाणीपुरवठा, आरोग्य, पशुसंवर्धन या विभागाच्या कामांमध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत. त्याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कडक शब्दांमध्ये सूचना दिल्या असून एप्रिलअखेरपर्यंत संबंधितांवर कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर संबंधित विभागाच्या सचिवांची थेट राज्यस्तरावर सुनावणी होईल, असे पंचायतराज समितीचे अध्यक्ष सुधीर पारवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 


समिती गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर होती. सन २०१३-१४ मधील लेखापरीक्षणाच्या मुद्यांद्वारे तपासणी करण्यात आली. २० आमदारांच्या समितीने गुरुवारी काही तालुक्यांना भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. शुक्रवारी सकाळी जि.प. मुख्यालयात आढावा बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी त्यांचा अनौपचारिक संवाद झाला. 


त्यावेळी अध्यक्ष पारवे म्हणाले, िजल्ह्यातील कामांची प्रत्यक्ष पाहणी आम्ही केली. काही अफरातफरीच्या प्रकरणांची वसुली करण्यात आली. काहींवर दंडात्मक कारवाई, वेतनवाढ थांबवण्याची कारवाई झाल्याचे आढळले. मार्च एण्डची धावपळ असल्याने अहवाल सादर करण्यासाठी एप्रिल अखेरची मुदत दिली आहे. त्यामध्ये दोषी आढळल्यास संबंधित विभागाच्या सचिवांची सुनावणी होईल. 


पाणीपुरवठाच्या काही योजना पाच वर्षांपासून बंद आढळल्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून हस्तांतरित करून घेण्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसले. काही ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारती नसून काहींच्या जुनाट आहेत. डीपीसीच्या जनसुविधा योजनेद्वारे बांधकामास स्वतंत्र निधी मिळतो. त्याद्वारे अद्ययावत कार्यालय उभारण्याच्या सूचना दिल्या. अनियमितता केल्याचे सुनावणीमध्ये निष्पन्न झाल्यास त्यांच्यावर ठोस कारवाई होणार. माध्यमिक शिक्षण, लघुपाटबंधारे, बांधकाम व गेल्या दहा पेक्षा अधिक वर्षांपासून जिल्ह्यात ठाण मांडून असणारे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कामांची सुनावणी होईल, असे पारवे यांनी सांगितले. 


शिक्षकांना सांगता आली नाही साध्या प्रश्नांची उत्तरे 
काही विद्यार्थ्यांनी त्यांना विचारलेल्या छोट्या प्रश्नांची उत्तरं दिली. पण, झेडपीच्या अनुषंगाने विचारलेल्या साध्या-साध्या प्रश्नांची उत्तरे खुद्द शिक्षकांना देता आली नाहीत. वर्गात लावलेल्या फलकांचे ते स्वत: वाचन करत नाहीत. शाळेतील किरकोळ दुरुस्तीची कामे शिक्षकांना वर्गणीद्वारे करता येऊ शकतात. शाळांमुळे शिक्षक असून सामाजिक कार्य म्हणून किरकोळ दुरुस्तीची कामे करावीत, अशा सूचना केल्याचे त्यांनी सांगितले. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक तक्रारी आहेत. त्यांची स्वतंत्र सुनावणी घेण्याच्या सूचना दिल्या.


काही ठळक नोंदी 
काही ग्रामसेवकांनी चांगले काम केले असून त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. ब्रह्मपुरीच्या ग्रामसेवकाने सांडपाणी शेतीसाठी देऊन दीड लाखाचे उत्पन्न मिळवले. 
पारधी घरकुले उभारण्यासाठी काही गावांनी जागा देऊन आदर्श निर्माण केला. 
सीईआे डॉ. भारूड यांना विकासकामांची तळमळ, सर्वसामान्यांच्या विकासाच्या अनेक योजना राबवतात. 

बातम्या आणखी आहेत...