आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महेश कोठेंवर फौजदारीची परवानगी द्यावी; पोलिसांची कोर्टाकडे मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- विष्णू लक्ष्मी को. ऑप डिस्टिलरीचे संचालक व शिवसेना जिल्हाप्रमुख महेश कोठे यांच्यासह इतर संचालक मंडळाविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची परवानी पोलिसांनी न्यायालयाकडे मागितली आहे. संस्थेचे सचिव इपलपल्ली यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यात व्यवस्थापक सुरेश मरगर यांच्याविरुद्ध अपहाराची फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. मात्र प्रकरणाच्या तपासणीत ही तक्रार खोटी असल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील सुनावणी सोमवारी (दि.१२) होणार आहे.

 
विष्णू लक्ष्मी डिस्टिलरीचे व्यवस्थापक सुरेश मरगर यांच्याविरुद्ध संस्थेचे वासुदेव इपलपल्ली यांनी न्यायालयात एक कोटी बत्तीस लाख रुपयांच्या अपहाराची फिर्याद दिली होती. त्यावर न्यायालयाने सीआरपी १५६ (३) प्रमाणे तपासाचे आदेश दिले होते. अार्थिक गुन्हे शाखेचे तपास अधिकारी सचिन पवार व निरीक्षक साळुंखे यांनी सखोल तपास केला. मात्र महेश कोठे, वासुदेव इपलपल्ली यांनी तसेच इतर संचालक मंडळाने बँकेचे खोटे स्टेटमेंट व कागदपत्रे बनविल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. 


फिर्यादी इपलपल्ली व संचालक मंडळातील महेश कोठे यांनी खोटी फिर्याद व खोटे पुरावे सादर केल्याचे निष्पन्न झाले. हे पुरावे खोटे असल्याचा लेखी अहवाल न्यायालयात सादर करून अारोपी व्यवस्थापक मरगर यांना निर्दोष ठरवण्याची मागणी पोलिसांनी केली आहे. फिर्यादी व संचालक मंडळातील कोठे यांनी बनावट कागदपत्रे व खोटी माहिती देऊन बनावट अहवाल केल्यामुळे त्यांच्यावर फौजदारी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी मरगर यांच्यातर्फे अॅड. नागराज शिंदे हे काम पाहत आहेत. 


तक्रार खोटी, कोर्टास अहवाल 
संस्थेचे सचिव इपलपल्ली यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल होऊन तपासणीसाठी प्रकरण आले होते. तपासात तक्रार खोटी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार विष्णू लक्ष्मी डिस्टिलरीच्या संचालकांवर फौजदारी दाखल करण्याची संमती मिळावी, असा अहवाल कोर्टास दिला आहे. त्यानुसार कोर्ट पुढील कारवाई करेल. 
- सचिन पवार, तपास अधिकारी 

बातम्या आणखी आहेत...