आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बार्शीत कर्णबधिर, मूकबधिर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार्शी- येथील इंडियन रेडक्रॉस संचलित बधिर मूक विद्यालयात कर्णबधिर व मूकबधिर विद्यार्थ्यांचा मेळावा झाला. कर्ण व मूकबधिरांच्या समस्यांचा ऊहापोह, शासनाच्या योजना, सवलतीवर चर्चा झाली. त्याबरोबरच नवीन तंत्रज्ञानाची ओळखही करून देण्यात आली. 


मेळाव्यात मूकबधिर विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती प्रोजेक्टरद्वारे देऊन प्रत्येकाने समाजात मिसळले पाहिजे. अपंग विद्यार्थ्यांना सरकारी व निमसरकारी संस्थेत कार्यालयात ३ टक्के आरक्षण आहे, यासाठी प्रयत्न करावेत. त्याचप्रमाणे कर्णबधिर व्यक्तीस आरटीओ परवाना मिळू शकतो या परिपत्रकाची कल्पना सर्वांना दिली व त्यादृष्टीने प्रयत्न करावेत. मेळाव्यासाठी अध्यक्ष सागर बोटे, उपाध्यक्ष इरफान सय्यद, अखर्व कुलकर्णी, सचिव बाळू मस्तुद, अक्षय भोसले, ईश्वर हिंगमिरे, सदस्य नवनाथ गाडे, नागेश जगताप, नितीन माळी, महेश खुने, विनोद ढावारे, अतुल खत्री, अनिल पवार, धनाजी तुपे यांनी परिश्रम घेतले

बातम्या आणखी आहेत...