आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. बोल्लींच्या जाण्याने साहित्य क्षेत्र सुन्न;साेलापूरच्या पद्मशाली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- कविश्रेष्ठ डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली यांच्या निधनाने साहित्य-कला क्षेत्रच नव्हे, पूर्वभागच सुन्न झाले होते. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी साेलापुरातील पद्मशाली स्मशानभूमीत शाेकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव नरेश यांनी मुखाग्नी दिला. बोल्ली यांच्या अंत्ययात्रेत विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.   


अक्कलकोट रस्ता एमआयडीसीतील घरापासून सकाळी साडेअकराला अंत्ययात्रा निघाली. अशोक चौकमार्गे शांती चौक स्मशानभूमीत पार्थिव आणले. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुरोहितांनी मंत्रोच्चार केला. उपस्थित सारे सुन्न झालेले होते. गटागटातील चर्चेत त्यांच्या साहित्याचा विषय होता. मराठी आणि तेलगू भाषेत त्यांच्या कविता होत्या. त्यांच्या कुटुंब सदस्यांच्या डोळ्यात फक्त अश्रू होते. त्यांच्या पत्नी ख्यातनाम निवेदिका, नाट्यकलावंत शोभा बोल्ली, कन्या ममता गोरंटला अादी शाेकसागरात बुडाले हाेते. कनिष्ठ बंधू सत्यनारायण बोल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विधी करण्यात अाले.


या वेळी साहित्य, कला, नाट्य, नृत्य, सहकार, राजकारण आदी क्षेत्रांतील दिग्गज उपस्थित होते. त्यात माजी खासदार धर्मण्णा सादूल, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी महापौर प्रा. पुरणचंद्र पुंजाल,  मसाप सोलापूर शाखा अध्यक्ष डॉ. सुहास पुजारी, प्रकाशक बाबूराव मैंदर्गीकर, व्यंगचित्रकार रविकिरण पोरे, दीपक देशपांडे, अनंत जोशी, ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग संगा, गुरू वठारे, अशोक इंदापुरे, प्रा. व्यंकटेश पडाल, विजय नक्का, लक्ष्मी बँकेचे संचालक आनंद बडगंची, तेलगू ग्रंथालयाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कमटम, सचिव तिपण्णा गणेरी, यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, चंद्रशेखर वडनाल, आनंद कुंभार आदी उपस्थित होते.  

 

साेलापुरात आज शोकसभा   
डाॅ. बोल्ली यांच्याप्रति भावना व्यक्त करण्यासाठी रविवारी शोकसभेचे आयोजन केले आहे. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अॅम्फी थिएटरात सायंकाळी साडेपाचला ही सभा होईल. सर्व क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन वाचनालयाचे कार्यवाह दत्ता गायकवाड यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...