आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सांगोल्यात अायपीएलवर सट्टा खेळताना अाठ जणांवर गुन्हा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सांगोला येथे अायपीएल मॅच दरम्यान सट्टा (बेटिंग) सुरू असताना ग्रामीण पोलिसांनी कारवाई करून अाठ जणांना पकडले. दोन चारचाकी वाहने, मोबाइल, बेटिंग खेळण्यासाठी लागणारे साहित्य असा ३९ लाखांचा एेवज जप्त करण्यात अाला. ही कारवाई सोमवारी मध्यरात्री सांगोला येथे झाली. दिल्ली डेअरडेव्हिल्स व किंग्ज एलेव्हन पंजाब या संघादरम्यान सामना सुरू असताना ही कारवाई झाली.


नाथा जाधव (रा. एकतपूर रोड, ड्रीम सिटी अपार्टमेंट, सोलापूर), दीपक बाबर (रा. वासूद रोड, सांगोला), गणेश िनंबाळकर (रा. धनगरगल्ली, सांगोला), अब्बास पटेल (मस्के काॅलनी, सांगोला), अनिक िकशन चव्हाण (रा. कृष्णाई बंगला, सांगोला), सुनील अानंदा भोसले (रा. चिंचोळीबेहरे, सांगोला), कृष्णा प्रभाकर साळुंखे (रा. कुंभारगल्ली, सांगोला), युवराज शिवराज मेटकरी (रा. गोंधळीगल्ली, सांगोला) यांच्याविरुध्द सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला अाहे. 


या पथकाने केली कारवाई 
विशेष पथक व गुन्हे शाखेच्या पथकानेही कारवाई केली. निरीक्षक विजय कुंभार, सहायक निरीक्षक उमेश धुमाळ, धांडे, फौजदार हेमंत भंगाळे, बाबूराव म्हेत्रे, रियाज शेख, निंबाळकर यांच्यासह अल्ताफ काझी, प्रेमेन्द खंडागळे, सर्जेराव बोबडे, सचिन वाकडे, नारायण गोलेकर, दिलीप राऊत, विजयकुमार भरले, रवी माने, बाळू चमके, अासिफ शेख, पांडुरंग काटे, सचिन गायकवाड, सागर शिंदे, अन्निसा शेख, नाझनीन मड्डी, दीपक जाधव, अंकुश मोरे, बुरजे, गणेश शिंदे, अक्षय दळवी, अभिजित ठाणेकर, श्रीकांत जवळगे, विलास पारधी, अमोल जाधव, सुरेश लामजाने, सचिन कांबळे, बाळराजे घाडगे, सागर ढोरे- पाटील, कृष्णा लोंढे, विष्णू बडे आदींचा समावेश होता. 


कृष्णाई बंगला व ड्रीम सिटी अपार्टमेंटमध्ये सुरू होता सट्टा 
अनिल चव्हाण याच्या कृष्णाई बंगल्यात पंजाब व दिल्ली संघावर बेटिंग सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात अाला. त्यावेळी चौघेजण मोबाइल व ट्रान्समिशन यंत्रणेव्दारे सट्टा घेत घेते. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी झाली. याशिवाय नाथा जाधव ( रा. ड्रीम सिटी अपार्टमेंट) येथे सट्टा चालू असल्याचे कळल्यानंतर तिथेही छापा मारून कारवाई झाली. दोन्ही कारवाईत एक लाख रुपये, दोन चारचाकी व तीन दुचाकी, दोन टीव्ही, ट्रान्समिशन मशिन, बारा मोबाइल, हेडफोन असे ३९ लाखांचे साहित्य जप्त करण्यात अाले अाहे. 

बातम्या आणखी आहेत...