आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्जबाजारीपणा, बहिणीच्या लग्नाच्या चिंतेने शेतकऱ्याच्या मुलीची आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण सोलापूर - घरची आर्थिक परिस्थिती बेताची, शेती आणि शिक्षणासाठी वडिलांनी काढलेले कर्ज आणि त्यातच बहिणीचे ठरलेले लग्न कसे होणार? या विवंचनेतून एका उच्चशिक्षित तरुणीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. शुक्रवारी (दि. २०) सकाळी अकराच्या सुमारास बरुर येथे ही दुर्दैवी घटना घडली. कविता विठ्ठल सुतार (वय २७, रा. बरुर) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. मंंद्रूप पोलिसांत याची नोंंद झाली आहे. 

 

बरुरचे विठ्ठल सिद्धप्पा सुतार यांंना पाच मुली. तीन एकर शेतीतील उत्पन्नावर धानम्मा व भौरम्मा या दोन मुलींंचे लग्न केले. श्रीदेवी, सविता व कविता या तीन मुलींंना शिक्षण दिले. श्रीदेवी व सविता यांचे एम. ए. बीएड.पर्यंत तर कविताचे एम.ए.पर्यंत शिक्षण झाले. 

पत्नीच्या निधनानंतर विठ्ठल यांनी परिस्थितीशी दोन हात करीत दीड एकर शेती विकून मुलींंना शिकवले. एका राष्ट्रीयीकृत बँकेचे ६० हजारांचे कर्ज घेतले. त्याचे २२ हजार व्याज झाले. गावातील इतरांंकडून घेतलेले पाच ते सहा लाख कर्ज त्यांंच्या डोक्यावर आहे. 


दरम्यान, श्रीदेवीचे कर्नाटकातील एका प्राध्यापकाशी लग्न ठरले. लग्न करून देण्याची जबाबदारी वडील विठ्ठल सुतार यांंनी उचलली होती. पण, कर्जबाजारी असल्याने वडील लग्न कसे करून देणार, याची काळजी कविताला सतावत होती. तिघी बहिणी उच्चशिक्षित असताना परिस्थितीशी तोंंड देत होत्या. शुक्रवारी सकाळी शेजारचे लग्न असल्याने वडील विठ्ठल व मुलगी श्रीदेवी कुडलला गेले होते. त्यामुळे घरी कविता व सविता दोघीच होत्या. सविता घराबाहेर काम करत होती. त्यावेळी कविता हिने घरातील आतल्या खोलीत जाऊन गळफास घेतला. हा प्रकार लक्षात येताच सविताने शेजाऱ्यांना सांंगितले. मंंद्रूप पोलिसांंनी घटनास्थळाचा पंंचनामा केला. मंंद्रूपच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक अजित त्रिपुटे तपास करत आहेत. 


घरकर्ती हुशार कविता गेली 
सर्वात लहान असूनही कविता घर सांंभाळत होती. जबाबदारीची व परिस्थितीची जाणीव होती. शाळेत हुशार होती. पण परिस्थितीला तोंंड देताना तिने टोकाचे पाऊल उचलायला नको होते. तिच्या जाण्याने आम्हा चारही बहिणींना धक्का बसला आहे. 

बातम्या आणखी आहेत...