आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SOLAPUR : पिता पुत्र झाले एकाच वेळी दहावी पास दोघांनाही मिळाले 57%

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिता:- शिवाजी ढेकळे - Divya Marathi
पिता:- शिवाजी ढेकळे

माढा (सोलापुर) - शिक्षण घ्यायला  आणि शिकायला कधी वयाचे बंधन नसते असे म्हणतात वयाच्या साठी सत्तरीतही दहावी बारावी परीक्षा पास होण्याच्या अनेक बातम्या तुम्ही आम्ही पहिल्या किंवा वाचल्या असतील मात्र माढा तालुक्यातील वडाचीवाडी (त.म) येथिल वडील आणि मुलगा एकाच वेळी दहावी पास झालेत.विशेष म्हणजे या पिता पुत्रांना 57 टक्केच गुण मिळालेत. या गोष्टीची (प्रकाराची )सोशल मीडियासह तालुक्यात सर्वत्र  चर्चा  सुरु आहे.

 

शिवाजी ढेकळे व विश्वजीत ढेकळे अशी या दोघा पिता पुत्राची नावे आहेत. शिवाजी ढेकळे  हे वडाचीवाडी गावचे सरपंच आहेत.वयाच्या 41 व्या वर्षी त्यांनी  दहावी बोर्डाची परीक्षा दिली . तर त्यांचा मुलगा विश्वजीत ढेकळे याने देखील वडीला बरोबरच दहावीचा गड सर केला आहे.

मी हाॅटेल व्यवसाय चालवतो.मला व्यवसाया बरोबरच राजकारणाची ही मोठी आवड आहे. वयोवृद्ध असूनही अनेक जण परीक्षा देतात.मला ही  दहावी  झाली नसल्याची खंत बोचत होती.मुलगा ही दहावीलाच होता.त्याने मला परीक्षा देण्यास प्रोत्साहीत केले.त्यानुसार मी फॉर्म भरुन परीक्षा दिली.तसेच मी गावचा सरपंच आहे.

 

आगामी काळात जर राजकारणात सरपंच किंवा अन्य राजकीय पदासाठी दहावी पास अशी शैक्षणिक अट झालि तर आपण ही  दहावी पास असायला हवे. पुढे ही शिक्षण सुरु ठेऊन बिए पदवी घेणार आहे. असे त्यांनी सांगितले.

 

पुढील स्लाईडवर पहा पिता पुत्रांचे फोटो ..... 

 

बातम्या आणखी आहेत...