आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकातील श्रावणबेळगोळ येथ पहिला मस्तकाभिषेक उद्या, 50 लाख भाविक येणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतिक फोटो... - Divya Marathi
सांकेतिक फोटो...

सोलापूर- कर्नाटकातील श्रावणबेळगोळ येथे शुक्रवारपासून शाेभायात्रेने महामस्तकाभिषेक साेहळ्यास प्रारंभ हाेत अाहे. या साेहळ्यासाठी आठ दिवसांत सुमारे ५० लाख नागरिक येण्याचा अंदाज अाहे. त्यासाठी परिसरात २० भोजनशाळा उभारण्यात अाल्या असून महाराष्ट्र, राजस्थान येथून सुमारे १०० टन धान्याची आवक झाली आहे.   


शनिवारपासून महामस्तकाभिषेक होत असून त्यासाठी सुमारे ४५० जैन मुनींचेही आगमन झाले आहे. शनिवारी पहाटे ५ ते दुपारी २ पर्यंत धार्मिक विधान होईल. दुपारी २ वाजता प्रथम महामस्तकाभिषेकास  सुरुवात होऊन ३.३० पर्यंत जलअभिषेक, सायंकाळी ३.३० ते ५.३० पर्यंत पंचामृत अभिषेक, सायंकाळी ५.३० ते ६ पर्यंत अष्टद्रव्य पूजा त्यानंतर रात्री ९.३० पर्यंत दर्शनाची सुविधा असेल. 

बातम्या आणखी आहेत...