आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थसंकल्पामध्ये शेती, आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांवर दिला आहे भर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- केंद्रीय अर्थसंकल्प हा शेती, आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांवर भर असणारा आहे, असा सूर सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चरच्या वतीने आयोजित वार्तालापातून व्यक्त झाला. चेंबर ऑफ कॉमर्स व के. पी. मंगळवेढेकर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट येथे गुरुवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादरीकरणाचे थेट प्रक्षेपण व पत्रकार वार्तालाप आयोजित केले होते. यावेळी चेंबर ऑफ काॅमर्सचे अध्यक्ष राजू राठी, प्रवक्ते पशुपती माशाळ, प्रभाकर वनकुद्रे, चार्टर्ड अकौंटंट श्रीनिवास वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते. 


जीएसटीनंतर मांडलेला अर्थसंकल्प हा भरीव तरतूद असलेला, प्रशिक्षित, नवीन रोजगार वाढीवर भर देणारा आहे. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीजवर १४०० कोटींची तर पीक विमा योजनांमध्ये भरीव तरतूद आहे. जगातील सर्वात जास्त हेल्थ केअर योजना लागू झाली आहे. छोट्या कंपन्यांचा फायदा होणार आहे. नवीन रोजगार निर्मिती होईल. टेक्स्टाइलकरिता ७ हजार १४८ कोटींची तरतूद आहे. स्मार्ट सिटीसाठी तरतूद आहे. 
- राजू राठी , अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स, सोलापूर 


लघु उद्योजक, उत्पादक, व्यापाऱ्यांकरिता विशेष काही सवलत किंवा योजना अर्थसंकल्पात नाहीत. व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक यांना आयकर रचनेत कुठलेही बदल केलेले नाहीत. व्यापारी वर्गाला दिलासा मिळणे आवश्यक होते. ई वे बिल कायद्यामध्ये जीएसटीमधील वस्तू या पूर्णपणे करमुक्त आहेत. त्यांना ई वे बिलमधून वगळणे आवश्यक होते. ४२ मेगा फूडपार्कची योजना स्वागतार्ह आहे. 
- पशुपती माशाळ, प्रवक्ता, चेंबर ऑफ कॉमर्स, सोलापूर 

बातम्या आणखी आहेत...