आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालसुधारगृहातून चार मुले पळून गेली; कुणी तरी फूस लावून पळवल्याचा संशय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- विविध गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यात असलेली चार मुले बाल सुधारगृह (रिमांड होम) येथून पळून गेली अाहेत. ही घटना २० एप्रिल रोजी घडली असून मंगळवारी सकाळी पोलिसात रिमांड होम येथील प्रमुख दीपक धायगुडे यांनी तक्रार नोंद केली अाहे. 


घटनेच्या दिवशी बंदोबस्तासाठी सहायक फौजदार डी. के. बऱ्हाणपुरे, त्यांना सहायक म्हणून मोहन चराटे होते. एक जण बाथरूमसाठी तर एकजण फ्रेश होण्यासाठी गेल्यानंतर चौघा मुलांनी मिळून लाॅकपची चावी काढून बाहेर पळून अाले. मुख्य प्रवेशद्वाराजवळ गेल्यानंतर चौघांना कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात अाला अाहे. 


या चौघांमध्ये एक मुलगा ढोकबाभूळगाव येथील आहे. त्याला एमअायडीसी पोलिसांनी पकडले होते. दुसरा देगाव येथील असून त्याला सलगरवस्ती पोलिसांनी पकडले होते. दोघेजण गुलबर्गा व विजयपूर येथील असून त्यांना लोहमार्ग पोलिसांनी पकडले. चौघांचा अजून शोध लागला नाही. पोलिस निरीक्षक नरसिंग अंकुशकर तपास करीत अाहेत. 

बातम्या आणखी आहेत...