आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमा उतरवण्याची थाप; तब्बल 1 कोटींचा गंडा; सात जणांवर गुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- विमा उतरवण्याची थाप मारून सात जणांनी एका निवृत्त कृषी अधिकाऱ्यास एक कोटी रुपयांना गंडवले. सखाराम यल्लप्पा केसकर (वय ६४, रा. सुरवसे नगर, कुमठा नाका) अधिकाऱ्याचे नाव आहे. हा प्रकार २८ फेब्रुवारी २०११ ते २० सप्टेंबर २०१७ दरम्यान घडला. केसकर यांनी सदर बझार पोलिसात २१ फेब्रुवारीला फिर्याद दिली आहे. त्यावरून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. विराज मल्होत्रा, सुमीत रंजन, आकाश बिडला, सुमीत अग्रवाल, अंजली शर्मा, आरती नारंग, रिचा भटनागर अशी त्यांची नावे आहेत. 


केसकर २००८ मध्ये रत्नागिरी येथे कार्यरत असताना दहा हजार रकमेचा विमा बिर्ला विमा कंपनीचा एजंट मंदार देखणे (रा. रत्नागिरी) याच्याकडून उतरवून घेतला. त्यावेळी देखणेसोबत आलेल्या खेडकर आणि जांभळे यांचा परिचय केसकरांशी झाला होता. पुढे फेब्रुवारी २०११ मध्ये विराज मलहोत्रा (रा. एस. ४४७, तिसरा मजला, पटेल फौंडेशन बिल्डिंग, शक्करपूर स्कूल ब्लॉक गुडगाव नोएडा, दिल्ली) नावाने एकाने केसकर यांना फोन केला. त्याने दिल्लीतून बोलत असल्याचे सांगत खेडकर व जांभळे यांचा हवाला दिला. बिर्ला सनलाइफ व श्रीराम लाइफ इन्शुरन्समध्ये अॅडव्हायझर्स असल्याचेही सांगितले. 


असे आले उघडकीस 
१७ फेब्रुवारी २०१५ रोजी इन्शुरन्स कस्टमर बोनस डिपार्टमेंट (हैदराबाद) यांचा ईमेल केसकर यांना आला. त्यात २ कोटी आठ लाख ४२५ रुपये देय असून खर्चापोटी सहा लाख ९१ हजार ४८ रुपये भरावे लागतील असे म्हटले होते. त्याची हैदराबाद कार्यालयात खात्री केल्यानंतर हे ई-मेल बनावट असून विराज मल्होत्रा, विजय मल्होत्रा, विनय मल्होत्रा या नावाची एकच व्यक्ती असून तिने अनेकांना फसवले आहे. त्यांच्याविरुध्द गुन्हे दाखल आहेत, त्यांची चौकशी चालू आहे, असे समजले. त्यानंतर केसकर यांनी सीबीआय, दिल्ली, पुणे, मुंबई येथे तक्रार दिली. 

बातम्या आणखी आहेत...