आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत पंढरपूरच्या कोमलला सुवर्ण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोमल जगदाळे - Divya Marathi
कोमल जगदाळे

पंढरपूर- कोईमतूर येथे सुरू असलेल्या १६ व्या ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाच्या येथील कोमल जगदाळे हिने तीन हजार मीटर (ट्रिपल चेस) धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. अवघ्या १० मिनिट ५४ सेकंदांमध्ये कोमलने हे अंतर पार करत देशात प्रथम क्रमांक पटकावला. या यशामुळे तिने आशियाई स्पर्धा आणि जागतिक स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात स्थान मिळवले आहे. 


पंढरपूर येथील पंतनगरमधील अजिंक्य क्रीडा स्पोर्ट््स क्लबची कोमल महाराष्ट्र संघाकडून या राष्ट्रीय स्पर्धेत खेळली. तिला क्लबचे सचिव चेतन धनवडे, कार्याध्यक्ष सुभाष मस्के यांचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान, पंढरपुरात क्रीडांगणाची कमतरता असल्याने शहर व तालुक्यातील खेळाडूंसाठी युटोपियन शुगर्सचे प्रमुख उमेश परिचारक यांनी लाखो रुपये खर्चून कोर्टी रस्त्यावरील पंतनगरात धावण्याचा ट्रॅक, अन्य क्रीडा स्पर्धेसाठी खास मैदान तयार केले आहे. या मैदानावर कोमल सराव करायची. 

बातम्या आणखी आहेत...