आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्राद्धाला गेलेल्या वीज उपअभियंत्याचा बंगला फोडून 17 तोळे सोने लंपास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- वडिलांच्या मासिक श्राद्धासाठी मोहोळला गेलेल्या महावितरणमधील उपकार्यकारी अभियंता युवराज उत्तम मोरे यांचा बंगला चोरांनी फोडला. सुमारे १७ तोळे सोन्याचे दागिने, दहा हजार रोख असा एकूण सुमारे सव्वापाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. खमितकर अपार्टमेंटजवळील यशनगर भाग एक मधील हा प्रकार अाहे. 


मोरे यांच्या वडिलांचे तीन महिन्यांपूर्वी निधन झाले. शनिवारी मासिक श्राद्ध असल्यामुळे ते मोहोळला शुक्रवारी रात्री परिवारासह गेले होते. घराच्या अातील दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून हाॅलमधील कपाटातील दागिने, रोकड चोरांनी काढून घेतली. मौल्यवान वस्तू धुंडाळताना चोरांनी कपाटातील कपडे अन्य वस्तू अस्ताव्यस्त टाकून दिल्या. मोरे यांना ही माहिती कळताच ते घरी परतले. फौजदार चावडी पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांचे श्वानपथक, ठसे पथक आले. तसेच गुन्हे शाखा, वरिष्ठ अधिकारीही अाले होते. पथकातील श्वान गेटपर्यंतच घुटमळले. ठसे घेण्यात आले. सहायक निरीक्षक गोविंद पांढरे तपास करीत अाहेत. 


चोऱ्यांचेसत्र कायम 
शहरातदररोज चोऱ्यांचे सत्र सुरूच अाहे. माजी जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांच्या घरात २३ तोळे, दाते गणपतीजवळ १७ तोळे, नवीपेठेतील रेडिमेड कापड दुकान, विजापूर रोडवरील सैफुल परिसरात चार घरांतून दहा तोळे, रूबीनगरात तीन घरांतून सात तोळे अाज पुन्हा १७ तोळे दागिने चोरीला गेले अाहे. अशा अनेक घटनांची मालिका सुरूच अाहे. फक्त चाटला साडी सेंटर दुकानात झालेली चोरी उघडकीस अाली असून पन्नास हजार रुपये जप्त करण्यात अाले अाहेत. 


चोरांच्या हाती सहज लागले घबाड 
रो-हाऊसमधीलमोरे यांच्या एक मजली बंगल्याच्या मुख्य गेटला कुलूप लावलेले नव्हते. त्यामुळे चोरांना थेट बंगल्याच्या आवारात प्रवेश करता आला. मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून चोरांनी घरात प्रवेश मिळवला. त्यानंतर मात्र त्यांना फार श्रम पडले नाहीत. कुलूप खराब असल्याने कपाटाचे दार जुजबी बंद होते. ते चोरांना सहज उघडता आले. मध्यरात्री एकपर्यंत शेजारच्या अंगणात गप्पा मारत बसले होते. सकाळी साडेसहाला शेजारील नातेवाइकांना मोरे यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसल्यामुळे शंका वाटली. त्यांनी मोरे यांना खबर दिली. मध्यरात्री एक ते पहाटे चार अशा चार तासांच्या दरम्यान चोरी केली असण्याची शंका पोलिसांना व्यक्त केली. 


चोरीस गेलेल्या दागिन्यांचे विवरण 
चार तोळे मोहिनी हार, तीन तोळे लाॅकेट, दोन तोळे पिळी अंगठी, एक तोळे अंगठी, चार तोळे पेंडल हार, दोन तोळे गंठण अन्य एक तोळे लहान विविध दागिने. दहा हजार रुपये रोख. 

बातम्या आणखी आहेत...