आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदाचा अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेला मुळापासून हलवणारा : गोविलकर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- अर्थसंकल्प म्हणजे अर्थशास्त्रीय कार्यक्रम नाही तर बऱ्याच गोष्टींचे प्रतिबिंब यात असते. तसेच याचा विविध गोष्टींवर प्रभाव होतो. यंदाचा अर्थसंकल्प हा अर्थव्यवस्थेला मुळापासून हलवणारा आहे, असे मत अर्थतज्ज्ञ विनायक गोविलकर (नािशक) व डॉ. सुनीती नागपूरकर (मुंबई) यांनी मांडले. सोलापूर सी. ए. शाखा व लोकमंगल को. ऑप. बँकेच्या वतीने अॅम्फी थिएटरमध्ये व्याख्यानाचे आयोजन केले होते. 


गाेविलकर म्हणाले, सरकारचा हा चौथा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प स्वार्थ आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी समोर ठेवून केलेला आहे. ग्रामीण भाग व मध्यमवर्गीय यांची बेमालूम सांगड घालून राजकीय प्रगल्भतेचा हा अर्थसंकल्प आहे. केवळ कोणत्याही एका क्षेत्राला भले मोठे पॅकेज जाहीर न करता, ते क्षेत्र कसे विकसित करता येईल? आणि त्यातील उत्पादन जगाच्या अखेरच्या टोकापर्यंत कसे पोहोचवता येईल? यासाठी केलेली ही मोठी गुंतवणूक आहे. या अर्थसंकल्पात अनुदानाची खिरापत वाटली गेलेली नाही. 


मोदी सरकारने पहिला अर्थसंकल्प तसा अर्धाच मांडला, परंतु दुसऱ्या अर्थसंकल्पामध्ये त्यांची दूरदृष्टी व दिशा दिसते. तिसऱ्या अर्थसंकल्पात त्यांच्या प्रामाणिकपणाचा आरसा दिसला. यंदाचा अर्थसंकल्प हा आर्थिक उद्दिष्टांवरची नजर ढळू न देता राष्ट्रहिताच्या दृष्टीचा आहे. 

बातम्या आणखी आहेत...