आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकमंगल, सिद्धेश्वर, मातोश्रीसह 11 कारखान्यांच्या काट्यांची तपासणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- साखर आयुक्तांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांत जिल्ह्यातील ११ साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी केली आहे. येत्या आठवडाभरात सर्व वजनकाट्यांची तपासणी करून जिल्हाधिकारी साखर आयुक्तांना अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती वैधमापन शास्त्र विभागाचे सहायक नियंत्रक एस. के. बागल यांनी दिली. 


शेतकरी संघटनेच्या तक्रारीवरून साखर आयुक्तांनी राज्यातील सर्वच कारखान्यांचे वजनकाटे तपासणीचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी तालुकानिहाय पथक स्थापन करून तपासणीचे आदेश दिले. पथकांमध्ये वैधमापन शास्त्र विभागाचा प्रतिनिधी, साखर आयुक्त कार्यालयाचा प्रतिनिधी, कारखान्याचा ऊस उत्पादक सभासद, तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांचा समावेश आहे. गेल्यास चार दिवसांमध्ये माळशिरस तालुक्यातील सहकारमहर्षी, पांडुरंग सहकारी, सासवड माळी शुगर, दक्षिण सोलापूर तालुक्यातील लोकमंगल, गोकुळ शुगर, जयहिंद शुगर, करमाळा तालुक्यातील आदिनाथ, भैरवनाथ फॅबटेक, उत्तर सोलापूर तालुक्यातील सिद्धेश्वर सहकारी, मंगळवेढा तालुक्यातील संत दामाजी कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये सर्व कारखान्यांचे वजनकाटे योग्य असल्याचे दिसून आल्याचे श्री. बागल यांनी सांगितले. 


गेल्या चार दिवसांत ११ साखर कारखान्यातील वजनकाट्यांची तपासणी केली आहे. येत्या आठवडाभरात उर्वरित सर्व कारखान्यांचे वजनकाटे तपासणी केली जाणार आहे. जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेले सर्वच पथक सदस्य यांची तपासणीवेळी उपस्थिती असते. काही तालुक्यात तहसीलदार यांच्याऐवजी नायब तहसीलदार, पोलिस निरीक्षकाऐवजी पोलिस नाईक सहभागी असतात. 


अशी करण्यात येते वजनकाट्यांची तपासणी... 
कारखान्यात प्रवेश केल्यानंतर पथकांकडून वजन केलेली वाहने त्यांच्या पावत्या ताब्यात घेतल्या जातात. त्यानंतर त्या वाहनांचे पुन्हा पथकासमोर वजन केले जाते. पथक येण्यापूर्वी दिलेली पावती पथकासमोर केलेल्या वजनाची पावती तपासणी केली जाते. यामध्ये बैलगाडी, ट्रॅक्टर ट्रक याचा समावेश आहे. ही वाहने रिकामी झाल्यानंतर पुन्हा त्याचे वजन करून वाहनांच्याही वजनाची पडताळणी केली जाते. याशिवाय वजनकाटे योग्य प्रकारे वजन दाखवितो का? याचीही पडताळणी कारखान्यात ते टन वजनाचे साहित्याचे वजन करून केली जाते. 

बातम्या आणखी आहेत...