आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंजुरीपत्रात खाडाखोड, आयत्या खड्ड्यात बंधारा बांधून लाटले पैसे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मंजूर बंधाऱ्याच्या ठिकाणी खोदकाम न करता  साखर कारखान्याच्या आयत्या  खड्ड्यात बंधारा बांधून  लघुसिंचन  अधिकाऱ्यांनी  नऊ लाखांचा निधी लाटला. जिल्हाधिकाऱ्यांनी  मंजूर केलेल्या अंदाजपत्रकावर ‘व्हाईट’नर  लावून  हा ‘ब्लॅक’ उद्योग  केला आहे. विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना  ही बाब माहीत असल्याची माहिती मिळत अाहे.  लाटलेल्या निधीचे ‘सिंचन’ त्यांच्याही खिशात झाल्याने   इतके दिवस या प्रकरणावर पांघरूण घालण्यात आले आहे. लघु सिंचन विभागाच्या सोलापूर कार्यालयात घोटाळा झाल्याची बाब समोर येत आहे.

 

उपअभियंता सुजित कोरे यांच्या भ्रष्टाचाराची एक- एक प्रकरणे समोर येत आहेत. जलयुक्त शिवारमधून येणकी (ता. मोहोळ) येथील शेतातील ओढ्यावर सिमेंट बंधार मंजूर  झाला. परंतु  कोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी  मंजूर केलेल्या पत्रावरील शेतकऱ्याच्या नावावर ‘व्हाईटनर’ लावून तेेथे शेतकऱ्याचे नाव लिहिले. त्या शेतात सांडपाणी सोडण्यासाठी साखर कारखान्याने खोदकाम केले होते. त्याच कामावर हा बंधारा बांधून खोदाईचे पैसे लाटले.  ठेकेदाराला हाताशी धरून हा सर्व प्रकार करण्यात आला. याबाबत सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारल्यावर समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. 

 

 उपअभियंता सुजित कोरे यांनी १९ वर्षांच्या कारकिर्दीत कोठे-कोठे कामे केली, याची माझ्याकडे माहिती नाही. येणकी येथील कामाची चौकशी करू.  दक्षता समितीच्या पत्रानुसार अहवाल पाठवला आहे, असे प्रभारी कार्यकारी अभियंता  एस. सी. कदम म्हणाले. तर येणकी  बंधाऱ्याच्या कामात उपअभियंता कोरे यांनी गैरप्रकार केला आहे. वरिष्ठांकडे पुराव्यासह  तक्रार केली.  परंतु कारवाई झाली नाही. मात्र,  पंचायत राज समितीने  सचिवांची साक्ष ठेवली आहे, अशी तक्रार एस. एस. अंबुरे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...