आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवानाचा मावस बहिणीशी प्रेमविवाह, लग्न मान्य नसल्याने कुटुंबीयांनी केली सुनेची हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहोळ- मावस भावाशी लग्न केलेल्या मुलीचा मुलाच्या कुटुंबीयांनी गळफास लावून खून केला. मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. शनिवारी (दि. १०) पहाटे येवती येथे हा प्रकार उघडकीस आला. रेखा श्रीकृष्ण लेंडवे (वय १९) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तीनजणांविरुद्ध येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. सासरा सुभाष औदुंबर लेंडवे (वय ५१), सासू जनाबाई सुभाष लेंडवे (वय ४५), दीर प्रशांत लेंडवे (वय २१, रा. काळे शिवार वस्ती, येवती, ता. मोहोळ) या संशयितांना अटक झाली आहे. 


यातील संशयित सुभाष लेंडवे आणि रेखा हिचे वडील रघुनाथ रावसाहेब जमदाडे (रा. येळवी, ता. जत, जि. सांगली) हे नात्याने एकमेकांचे साडू आहेत. लेंडवे यांचा मुलगा श्रीकृष्ण (वय २३) हा सैन्यदलात कार्यरत आहे. सध्या तो पठाणकोट (पंजाब) येथे नेमणुकीस आहे. 
उर्वरित.पान 


तोमावशीच्या येळवी येथील घरी जायचा. त्यातूनच जमदाडे यांची मुलगी रेखा आणि श्रीकृष्ण यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. मोबाइलवरून त्यांच्यात नेहमी संपर्क होता. श्रीकृष्ण याने रेखाला आपल्या घरी येवती येथे नेतो, असे सांगून आणले. मात्र घरी जाता दोघांनी सप्टेंबर महिन्यात लग्न केले. नंतर त्याने माेबाइलवरून रेखाच्या आई-वडिलांना लग्नाचे फोटो पाठवले. मात्र, ते दोघे नात्याने मावस भाऊ-बहीण असल्याने श्रीकृष्णच्या कुटुंबीयांना हे लग्न मान्य नव्हते. त्यामुळे ते रेखावर चिडून होते. 


तीन महिन्यांपूर्वी श्रीकृष्णने रेखाला येवतीत घरी सोडले. त्याचे वडील सुभाष यांनी राहण्यास चांगले घर नसल्याचे सांगत रेखाला दोन महिने माहेरी नेण्यास तिच्या वडिलांना सांगितले. तिच्या आई-वडिलांनी तिला येळवीला नेले. दोन महिन्यानंतरही सासरची मंडळी बोलवायला आल्याने रघुनाथ यांनी सुभाष यांना मुलीला नेण्याची विनंती केली. त्यांनी आणून सोडायला सांगितल्याने जमदाडे यांनी डिसेंबर रोजी येवतीला आणून सोडले. शुक्रवारी (दि. ९) पहाटे सव्वातीन वाजता सुभाष यांनी रघुनाथ यांना फोनवरून रेखाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले. ते नातेवाइकांसह शनिवारी सकाळी येवतीला आले. घरी काहीही नव्हते. शेतातील वस्तीमागे प्रेत जाळल्याचे दिसले. तेथे कोणीही नव्हते. त्यामुळे त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब जाधव तपास करत आहेत. 


संशय येऊ नये म्हणून आसपासचे गवतही पेटवून दिले 
संशयिततिघांनी अत्यंत निर्दयपणे तारेने रेखाचे हातपाय बांधले. त्यानंतर गळफास लावून तिची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी शेतातील मोकळ्या रानात मृतदेह जाळला. आगीमुळे परिसरातील लोकांना संशय येऊ नये, यासाठी आसपासचे गवतही पेटवून दिल्याचे घटनास्थळाच्या पाहणीवरून दिसते, असे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...