आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: सोलापूरची ज्योती कॉलेज जर्नी चित्रपटात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- अभिजित साठे दिग्दर्शित 'कॉलेज जर्नी' या चित्रपटात सोलापूरच्या ज्योती बसवंंती या युवतीने भूमिका साकारली आहे. ज्योतीचा हा पहिला चित्रपट असून महाराष्ट्रातून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 


बालनाट्यातून काम केलेल्या ज्योती बसवंती हिने बालाजी क्रिएशन या निर्मिती संस्थेतून पहिल्यांदाच चित्रपटांतून काम केले आहे. या चित्रपटात बसवंतीने मुख्य भूमिका साकारणाऱ्या या कलावंतांच्या मैत्रिणीची भूमिका साकारली आहे. 


साठे यांनी कॉलेज जर्नी या चित्रपटाची ऑडिशन सुरू केली होती. माझ्या काकांनी मला त्या संदर्भात माहिती दिली आणि तूही ऑडिशनला जा, असे सुचविले. त्यानंतर मी थेट पुणे गाठले आणि ऑडिशन दिली. त्यानंतर अभिजित साठे यांनी माझी निवड झाल्याचे कळविले आणि मला चित्रपटात भूमिका मिळाली. 


असे आहे कथानक 
दहावीच्या परीक्षेनंतर मुलं -मुली महाविद्यालयीन जीवनाकडे वळतात. तेव्हा त्यांना कोणत्याही प्रकारचे बंधन नको असते. या वयात मुला मुलींना पालकांनी कसे समजून घ्यावे व मुला- मुलींनी आपल्या पालकांसोबत कसे वागावे याचे दर्शन देणारा हा चित्रपट आहे. 


पहिल्यांदा चित्रपटात काम केले 
शाळेत असताना बालनाट्यातून काम केले होते. चित्रपटाचा अनुभव केवळ प्रेक्षक म्हणूनच होता. आपण चित्रपटात अशा पद्धतीची भूमिका साकारू याबद्दल काहीही कल्पना नव्हती. मात्र कॉलेज जर्नी या चित्रपटाच्या माध्यमातून साठे सरांनी मला ही संधी दिली आणि माझे स्वप्न पूर्ण झाले.
- ज्योती बसवंती, अभिनेत्री 

बातम्या आणखी आहेत...