आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'म्होरक्या' कर्जमुक्त करणार असे म्हणाले होते, परंतु खासगी सावकारांना ते कुठे मान्य होते...?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- म्होरक्या नावाचा मराठी चित्रपट आपण बनवतोय. त्यासाठी खूप पैसे खर्च केले. तो प्रदर्शित झाला, की आपण कर्जमुक्त होऊ... असे ते म्हणाले होते. खूप आनंदी होते. दरम्यान, त्यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्यांच्यावरील उपचारासाठी खासगी सावकारांना गाठावे लागले. पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलनंतर हैदराबादला जाऊन आले. आैषधोपचार सुरू असतानाच, सावकारांचा तगादा सुरू झाला. त्यामुळे त्यांचा आनंदी चेहरा काळवंडला. घरात मुलांशी गप्पागोष्टी करणारे ते अबोल बनले. काही सांगत नव्हते. बाहेरील खोलीत जाऊन झोपत होते. त्या रात्री झोपण्याच्या बहाण्यानेच गेले, अन् पुन्हा परतलेच नाहीत... 


मला तीन मुलं. मोठी स्वस्तिका (वय ७), दुसरी श्रेय (६) आणि शेवटचा मुलगा धनराज (४). स्वस्तिकावर त्यांचे खूप प्रेम. तिच्याच नावाने 'स्वस्तिक डेव्हलपर' म्हणून कार्यालय उघडलं. जागा खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला. बऱ्यापैकी पैसे गाठीला बांधले अन् सिनेमा बनवण्यासाठी घातले. तो प्रदर्शित होण्यापूर्वीच देवाने त्यांना न्यावे? आज मुलं विचारताहेत, 'पप्पा कुठे गेले..? कधी येणार..?' काय उत्तरे देऊ मी...(बराच वेळ दाबून ठेवलेला अश्रूंचा बांध फुटला... पुन्हा सावरत) मला आजाराची चिंता नाही. सिनेमाची अाहे. तो लागला की, आपण सारे मिळून बघूया, असेही ते म्हणत होते... 


परंतु सावकारांनी त्यांचा पिच्छा सोडला नाही. सकाळी उचलून नेले, की रात्रीच सोडत. गोळ्या- आैषधे न घेता, जेवणही न करता, ते खोलीत झोपायला जात. शेवटच्या घटकेला मुलांशी बोलणेही सोडून दिलेले...त्यांची आई हवालदिल झालेली. पण, एके दिवशी त्याच खोलीत जीवनयात्रा संपवतील, असे कधीच वाटले नव्हते..." 

 
मुलीचा आवाज गोड, गायक बनवायचे होते 
मोठी मुलगी स्वस्तिका हिचा आवाज अतिशय गोड. तिच्याशी बोलताना कल्याण हरखून जायचा. तिला गायिका बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगून होता. सर्व मुलांनी खूप शिकावे म्हणून संगमेश्वर इंग्लिश स्कूलमध्ये घातले. त्यांचे खूप लाड पुरवले. पोलिआेमुळे दोन्ही पाय लुळे पडलेले असताना त्याची प्रचंड धडपड होती. देवाने आधीच अन्याय केलेल्या माझ्या कल्याणला कॅन्सरने गाठावे अाणि सावकारांनी छळावे. शेवटी गळफासच घ्यावा लागावा हा कुठला न्याय आहे? 
- रुक्मिणी पडाल (कल्याणच्या आई) 

बातम्या आणखी आहेत...