आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्ज देतो म्हणून पोलिसाला साडेपाच लाखांना गंडवले; गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- कर्ज देण्याचे आमिष दाखवून नाशिकच्या पाच जणांनी संगनमत करून येथील पोलिस कर्मचाऱ्यास लाख ४० हजार रुपयास गंडवले. याबाबत सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

 

सतीश काटे यांनी याबाबत फिर्याद दिली असून संदीप पाटील, माही चावला, अभिषेक नाईक, मिथीलेश कुमार, सत्येंद्र राम (रा. नाशिक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काटे हे पोलिस मुख्यालयातील नियंत्रक पथकामध्ये पोलिस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. एक जाहिरात पाहून काटे यांनी संपर्क केला. तेव्हा त्यांनी दोन टक्क्यांनी ४८ लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज देण्याचे आमिष दाखवले. तसेच विविध कारणे सांगून २९ नोव्हेंबर २०१७ ते १२ डिसेंबर २०१७ या दरम्यान लाख ४० हजार रुपयांची रक्कम काढून घेतली. 


१२ डिसेंबर रोजी जेव्हा त्यांनी तुमचेे पैसे जप्त झाले आहे, तुम्ही एक लाख रुपये पाठवा असे सांगितले. तेव्हा सतीश काटे यांना त्यांच्यावर संशय आला आणि थेट पोलिस ठाणे गाठले आणि लाख ४० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद दिली. वरील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...