आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडाल आत्महत्या प्रकरणात पोलिस गाफील का राहिले? आमदार प्रणिती शिंदे यांचा प्रश्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- खासगी सावकारांच्या तगाद्याला कंटाळून एक अपंग युवक आत्महत्या करण्याचा मार्ग स्वीकारतो. त्याबाबत पोलिसांना लेखी कळवतो. तरीही पोलिस गाफील कसे राहिले? खासगी सावकारांना रोखण्याची जबाबदारी कुणाची? असे प्रश्न आमदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केले. 


'म्होरक्या' या मराठी चित्रपटाचे निर्माते कल्याण पडाल यांच्या आत्महत्या प्रकरणी त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. गरजू कामगारांना कर्जे देऊन त्यांच्याकडून अधिक पैसे उकळण्याचा व्यवसाय काही खासगी सावकार करत आहेत. अशांचा वेळीच बंदोबस्त करणे हे पोलिसांचे कामच अाहे. परंतु त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे अवैध सावकारी फोफावली. त्यांचा तगादा वाढला. परिणामी आत्महत्या... हे दुष्टचक्र रोखण्यासाठी पोलिसांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे. परंतु पडाल यांच्या प्रकरणात पोलिस गंभीर नाहीत हेच दिसून येते, असा ठपकाही त्यांनी ठेवला. या वेळी निरंजन बोद्धूल, गणेश डोंगरे, अंबादास करगुळे, मनीष गडदे, प्रा. व्यंकटेश पडाल, माजी नगरसेविका आशा म्हेत्रे यांची उपस्थिती होती. 


श्रीनिवास संगा सापडला नाही, त्याचा भाऊ अटकेत 
कल्याण पडाल यांनी गेल्या गुरुवारी (ता. १७) अशोक चौकातील राहत्या घरी गळफास घेतला. त्याच्या दोन दिवस अगोदर म्हणजेच १५ मे रोजी पोलिस अायुक्तांना तक्रारी अर्ज दिला. त्यात खासगी सावकार अन् कुख्यात गुन्हेगार श्रीनिवास संगा, संतोष बसुदे यांची नावे, पत्ते, मोबाइल क्रमांक दिले. त्यांच्या छळामुळे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले होते. एवढे घडूनही पोलिस गंभीर नव्हते. त्यामुळे दोन्ही सूत्रधार फरार झाले. आत्महत्या घटनेनंतर तब्बल सहा दिवसांनी संगा याचा भाऊ संतोष ऊर्फ पिंटू (वय २७, रा. विजयनगर, न्यू पाच्छा पेठ, सोलापूर) याला अटक केली. त्याने १५ मे रोजी कल्याण पडाल यांना घरातून उचलून नेले होते. दमदाटी करून हातपाय तोडून देण्याची धमकी दिली होती. त्यानुसार त्याला अटक करून मंगळवारी न्यायालयात उभे केले असता, २५ मेपर्यंत त्याला पोलिस कोठडी मिळाली. सूत्रधारांचा तपास सुरू असल्याचे जेलरोडचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत जंगम यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...